हिंगोली : माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण अभियान अंतर्गत योग विद्याधाम, नगरपरिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने जलेश्वर तलाव येथे श्रमदानातून स्वच्छता

राजेश दारव्हेकर
Friday, 25 December 2020

शहरातील मुख्य भागात असलेल्या जलेश्वर तलाव हे शहराचे सौंदर्य वाढवते पण त्या ठिकाणी काहीलोक कचरा टाकून घाण करीत आले आणि शहराची सौंदर्य नष्ट करीत आहे.

हिंगोली : माझी वसुंधरा, स्वच्छ सर्वेक्षण २०२१ जनभागीदारी अभियान अंतर्गत योग विद्याधाम आणि नगरपरिषद यांच्या सयुंक्त विद्यमाने शुक्रवारी (ता. २५)  जलेश्वर तलाव येथील स्वच्छता करून श्रमदान करण्यात आले.

शहरातील मुख्य भागात असलेल्या जलेश्वर तलाव हे शहराचे सौंदर्य वाढवते पण त्या ठिकाणी काहीलोक कचरा टाकून घाण करीत आले. आणि शहराची सौंदर्य नष्ट करीत आहे. नगर परिषद स्वच्छते साठी दिवसरात्र राबत आहे, सद्या सुरु असलेल्या स्वच्छ सर्वेक्षण २०२१ आणि माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत याची जनजागृती सुद्धा करण्यात येत आहे. 

हेही वाचा नांदेड : कर्नाटक राज्यातील सीमावर्ती भागातील दारु दुकाने बंद- डॉ. विपीन -

त्याअनुषंगाने योग विद्याधाम यांचे सर्व साधक यांनी पुढे येऊन नगरपरिषद कर्मचारी यांना सोबत घेवून जलेश्वर तलाव येथील स्वच्छता करून श्रमदान केले. आणि त्यांच्याद्वारे  शहरातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले  की, आपण कचरा हा ईतरत्र कुठेही न टाकता नगरपरिषदच्या घंटागाडीमध्येच टाकावा आणि शहर स्वच्छ,सुंदर आणि हरित ठेवण्यासाठी हातभार लावावा.

यावेळी योग विद्याधामचे सर्व साधक आणि नगर परिषदचे कर्मचारी बाळू बांगर, मुंजाजी बांगर, गजानन बांगर, दिनेश वर्मा, विजय शिखरे, माधव सुकते, गोपाल आठवले, रेखाबाई आठवले, चंद्रभान आठवले, शारदाबाई गायकवाड, अशोक चव्हाण, आकाश गायकवाड, चेतन भूजवने, प्रताप भूजवाने, अनिल गालफाडे व स्वच्हागृही बाबुराव खरात, सुमित कांबळे, गजानन जगताप, अजय मंडले, करण पउळकर, सागर गडप्पा, शक्ती कांबळे, मनीष दराडे, गणेश बांगर, आकाश गायकवाड यानी सहभाग घेतला.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: My Vasundhara, under the Swachh Sarvekshan Abhiyan, Yoga Vidya Dham, Nagar Parishad jointly cleaned Jaleshwar Lake through labor hingoli news