esakal | हिंगोली : डोंगरगाव पूल येथील दोन चिमुकल्या भावंडाचा गुढ मृत्यू, परिसरात हळहळ
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

औषधो उपचार करून मुलीला आखाडा बाळापूर येथे रुग्णालयात घेऊन येत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. तसेच मुलाचा देखील याच कारणाने मृत्यू झाला.

हिंगोली : डोंगरगाव पूल येथील दोन चिमुकल्या भावंडाचा गुढ मृत्यू, परिसरात हळहळ

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील दोन बालके त्यांच्या आई सोबत हदगाव तालुक्यातील कोहळी येथे मामाच्या गावी गेली होती. गुरुवारी (ता. २२) रात्री त्यांना जेवणानंतर ठसका लागला तो थांबेना. त्यामुळे त्यांना हदगाव जवळील निवघा बाजार येथे रुग्णालयात नेण्यात आले. औषधोउपचार करून मुलीला आखाडा बाळापूर येथे रुग्णालयात घेऊन येत असताना तिचा रस्त्यातच मृत्यू झाला. तसेच मुलाचा देखील याच कारणाने मृत्यू झाला.

याबाबत माहिती अशी की,  की कळमनुरी तालुक्यातील डोंगरगाव पूल येथील अमोल शिंदे यांची पत्नी पल्लवी शिंदे ह्या आपली चिमुकली दोन मुले आर्यन (वय तीन वर्ष) व मुलगी आराध्या (वय एक वर्ष) यांना घेऊन हदगाव तालुक्यातील कोहळी येथे दोन दिवसांपूर्वी आपल्या माहेरी गेली होती. 

हेही वाचा सचखंड गुरुद्वाराच्या ‘हल्लाबोलसाठी उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी -

येथे गुरुवारी (ता. 22) रात्री जेवनानंतर आराध्याला उलट्या व ठसका लागला. उलट्या जास्त प्रमाणात होत असल्यामुळे पल्लवी यांनी मुलीला डोंगरगाव पुल येथे घेऊन आल्या. नंतर शुक्रवारी (ता. २३) सकाळी बाळापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले मात्र येथे तीचा दुर्दैवी मृत्यू झाला. मुलीच्या अंत्यविधीची तयारी सुरू असताना मुलगा आर्यन याचाही मामाच्या गावी याच कारणामुळे मृत्यू झाल्याचा निरोप आल्याने शिंदे कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला.

डोंगरगाव पुल येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार

आखाडा बाळापूर येथील रुग्णालयात मुलींचे तर मुलाचे निवघा बाजार येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले आहे. या दोन्ही भावंडावर डोंगरगाव पुल येथे शोकाकुल वातावरणात शुक्रवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

येथे क्लिक करातेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांकडून मराठवाड्यावर अन्याय; बाभळी बंधारा कोरडाच -

अमोल शिंदे यांना दोनच अपत्य होती

या दुर्दैवी घटनांमुळे परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे. या दोन भावंडाचा मृत्यू कशाने झाला याची चर्चा गाव व परिसरात होत असुन त्याचा रुग्णालयातील तपासणी अहवाल आल्यावर हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान अमोल शिंदे यांना दोनच अपत्य होती. अमोल शिंदे हे शिवणकाम करतात तर पत्नी पल्लवी घरकाम करते.

संपादन-  प्रल्हाद कांबळे