Hingoli : आ.संतोष बांगर यांच्या हस्ते नागनाथ मंदिराच्या वेबसाइटचे उद्‍घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar

Hingoli : आ.संतोष बांगर यांच्या हस्ते नागनाथ मंदिराच्या वेबसाइटचे उद्‍घाटन

औंढा नागनाथ : नागनाथ तिर्थक्षेत्राच्या वेबसाइटचे उद्‍घाटन सोमवारी (ता. १४) आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते झाले.औंढा नागनाथ हे एक अग्रगण्य तीर्थक्षेत्र आहे. येथे वर्षभरात राज्यासह देशभरातून असंख्य भाविक येत असतात. या भाविकांना दर्शनासाठी निवासासाठी अनंत अडचणी येतात. ही सगळी गैरसोय लक्षात घेता नागनाथ संस्थानने एक स्वयंपूर्ण अशी वेबसाइट प्रकाशित केली आहे. त्यामध्ये येणाऱ्या सर्व भाविकांना वाहतुकीसाठी, निवासासाठी, दर्शनासाठी, पूजेसाठी व भोजनासाठी जी काही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. यासोबत मंदिराच्या परिसराची व ज्योतिर्लिंगाची, मंदिराची माहिती यामध्ये समाविष्ट करण्यात आली आहे.

नागनाथ संस्थांचे पदसिद्ध सल्लागार तथा आमदार संतोष बांगर व देवस्थानचे पदसिद्ध अध्यक्ष तथा तहसीलदार डॉ. कृष्णा कानगुले यांच्या हस्ते वेबसाइटचे उद्‍घाटन झाले. यावेळी मुख्यधिकारी वैजेनाथ भालेराव, तलाठी गजानन हजारे, मुख्य पुजारी हरीहर भोपी, लिपिक ज्योती केजकर, युवा जिल्हाध्यक्ष राम कदम, नगराध्यक्ष कपिल खंदारे, उपनगराध्यक्ष साहेबराव देशमुख, माजी उपसभापती अनिल देशमुख,

देवस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, शिवसेना नेते राम नागरे, रुग्ण कल्याण समिती सदस्य माधव गोरे, नगरसेवक राहुल दंतवार, प्रदीप कनकुटे, मनोज देशमुख, अनिल देव, विजयकुमार देशमुख, प्रदुग्न नागरे, शंकर यादव, कृष्णा पाटील, नागेश माने, राघव जोशी, पद्ममाक्ष पाठक, नामदेव पाटील, गणेश जगताप, बबन सोनुने, सुरेखाताई शिंदे, मुकेश पडोळे, जगदीप दिंडे, संजय मोरे आदी उपस्थित होते.