esakal | हिंगोली : लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई होईना
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

लॉकडाऊन काळात जिल्हा परिषदेच्या कार्यालायात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला होता. तसेच उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा ही बजावन्यात आल्या होत्या.ही मोहीम केवळ चार पाच दिवस राबविण्यात आली. त्यानंतर या मोहिमेला घरघर लागली.

हिंगोली : लेटलतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई होईना

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : येथील जिल्हा परिषदेच्या विभागातील कामकाज दिवाळीनंतर सुरु झाले, परंतू कार्यालयात उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जात नसल्याने लेट लतीफ कर्मचारी उशिराने दाखल होत आहेत.

लॉकडाऊन काळात जिल्हा परिषदेच्या कार्यालायात उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनाच्या वतीने कारवाईचा बडगा उगारला होता. तसेच उशिराने येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटिसा ही बजावन्यात आल्या होत्या.ही मोहीम केवळ चार पाच दिवस राबविण्यात आली. त्यानंतर या मोहिमेला घरघर लागली.

जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांनी गेली सात माहिन्यापूर्वी ऐन लॉकडाऊन काळात लेट लतिफाना धडा शिकविण्यासाठी  कार्यालयीन वेळेत न येणाऱ्या कर्मचाऱ्यांची नोंद लेट लतीफ मस्तरवर घेऊन कारणे दाखवा नोटीस बजावली होती. त्यानंतर मात्र हि मोहीम बंद पडली.

हेही वाचा नांदेड विभागात चार लाख टन उसाचे गाळप, दोन लाख ६३ हजार क्विंटल साखरचे उत्पादन

गेली चार दिवस दिवाळीच्या सुट्या असल्याने कर्मचारी गावाकडे गेले होते. मात्र पाच दिवसानंतर दिवाळी संपल्याने मंगळवार पासून प्रशासकीय कार्यालये सुरु झाली. पहिल्याच दिवशी विविध विभागात कर्मचार्यांनी दांड्या मारल्या तर काही कर्मचारी उशिराने दाखल झाले तरी लेट लथीफावर कारवाई झाली नाही. गुरुवारी ता. १९ देखील बहुतांश विभागातील कर्मचाऱ्यांनी रजा टाकल्या तर काहींनी दांड्या मारल्याने जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कर्मचारी नसल्याने शुकशुकाट दिसून आला.लेट लतीफ कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार का अशी चर्चा जिल्हा परिषद वर्तुळात ऐकावयास मिळत होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे