हिंगोली : कुरुंदा येथे ट्रकने चिरडल्याने एकाचा जागीच मुत्यू

मारोती काळे
Saturday, 12 December 2020

संजय बर्गे (वय ३६) याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा मयताची ओळख पटली.

कुरुंदा (जिल्हा हिंगोली )  : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथील फाट्यावर शुक्रवारी (ता. ११) रात्री मालवाहतूक ट्रकने एकास एकास चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक फरार झाला असून पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

कुरुंदा येथील बसस्थानक वरील फाट्यावर ट्रक क्रमांक( एम एच २६ एडी ८३५) हा मोंढ्यातील मालवाहतूक करण्याकरिता जात असताना निष्काळजीपणे वाहन चालकाने वाहन चालविल्याने फाट्यावर उभा असलेला संजय बर्गे (वय ३६) याच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्री उशिरा मयताची ओळख पटली. घटनास्थळावरून ट्रक चालक फरार झाला असून ट्रक कुरुंदा पोलिस ठाण्यात लावण्यात आला आहे. मयत हा मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होता .या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत असून मयताचे शवविच्छेदन कुरुंदा आरोग्य केंद्रात करण्यात आले. मयताच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी,आई असा परिवार आहे.

हेही वाचा  हिंगोलीत शेतकऱ्यांच्या विरोधात अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या रावसाहेब दानवे यांच्या विरोधात  आंदोलन व निदर्शने

घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक  सुनील गोपिनवार, फोजदार सविता बोधणकर, हवालदार श्री आमले, बालाजी जोगदंड, बालाजी पांचाळ आदींनी भेट देऊन घटनेचा पंचनामा केला. कुरूंदा पोलिस ठाण्यात ट्रक  चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

 

संपादन-  प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: One died on the spot after being crushed by a truck at Kurunda hingoli news