esakal |  हिंगोली : दुचाकी- कंटेनरअपघातात एकाचा मृत्यू 
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार ता. ३१ सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कळमनुरी- बाळापुर मार्गावरील साळवा पाटीजवळ घडली आहे.

 हिंगोली : दुचाकी- कंटेनरअपघातात एकाचा मृत्यू 

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

कळमनुरी (जिल्हा हिंगोली) : भरधाव कंटेनर चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवार (ता. ३१) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कळमनुरी- बाळापुर मार्गावरील साळवा पाटीजवळ घडली आहे.

याबाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे कळमनुरी येथील न्यायालयात कनिष्ठ लिपिक या पदावर कार्यरत असलेला वसमत येथील प्रमोद गंगाधर पवार (वय ३२) राहणार काळी पेठ वसमत हा आपल्या स्कूटी क्रमांक (एमएच- ३८झेड- ९७३७)  वरून शनिवारी वसमत येथून कळमनुरीकडे येत होता. कळमनुरी आखाडा बाळापूर मार्गावर साळवा पाटीजवळ असलेल्या एका ढाब्याजवळ हिंगोलीवरून नांदेडकडे जाणाऱ्या भरधाव कंटेनर क्रमांक (एच आर ३८ डब्ल्यू ४०९५) या वाहनाने समोरून येणाऱ्या स्कुटीला जोरदार धडक दिली. या धडकेमध्ये स्कुटी चालवीत असलेल्या प्रमोद पवार हा गंभीर जखमी झाला.

बाळापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

त्यातच कंटेनरचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला अपघातानंतर कंटेनर चालकाने घटनास्थळावरून वाहन घेऊन पलायन केले. अपघाताची माहिती आजूबाजूच्या नागरिकांनी तातडीने बाळापुर पोलिसांना दिली बाळापूर पोलिसांनी तातडीने हालचाली करीत अपघातास कारणीभूत ठरलेल्या कंटेनर चालकाला बाळापूर येथे थांबण्यास भाग पाडून कंटेनर चालक संजयकुमार चंद्रशेखरसिंग राहणार छत्रपूर तालुका नारायणपूर जिल्हा भोजपुर बिहार यास ताब्यात घेतले. याप्रकरणी सुनिल पवार यांच्या तक्रारीवरून बाळापुर पोलिसांनी अपघातास कारणीभूत ठरल्या प्रकरणी कंटेनर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे