हिंगोली : जिल्ह्यात रब्बीच्या पिकांसाठी केवळ १३ टक्के कर्ज वाटप, बँकांची उदासीनता

राजेश दारव्हेकर
Friday, 27 November 2020

परंतु बँकाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पिककर्जापासुन वंचित राहावे लागत आहे.  यावर्षी बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १३.०२ टक्के  कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे .

हिंगोली : शेतकऱ्यांना सातत्याने आसमानी, सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पीककर्ज हा मोठा आधार ठरतो. परंतु बँकाच्या उदासीनतेमुळे शेतकऱ्यांना पिककर्जापासुन वंचित राहावे लागत आहे. यावर्षी बँकांना दिलेल्या उद्दिष्टापैकी केवळ १३.०२ टक्के  कर्ज वाटप झाल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

 

रब्बी हंगामासाठी एक ऑक्टोबरपासून जिल्ह्यात पीककर्ज वाटपाची प्रक्रिया राबविली जात आहे. सुरुवातीपासूनच पीककर्ज वाटपाची प्रक्रिया अत्यंत संथगतीने सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. यंदाच्या वर्षासाठी रब्बी जिल्ह्याला रब्बी हंगामासाठी एकूण २७४ कोटी ७८ लाख रुपये कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे.यातील केवळ ३७ कोटी ७७ लाख ३८ हजार रुपये वाटप शेतकऱ्यांना कर्जापायी देण्यात आले आहेत.ज्याचा लाभ ४ हजार ९१  शेतकयांना झाला आहे. जिल्ह्यात २१ नोव्हेंबर पर्यंत फक्त १३.०२ टक्के कर्जवाटप करण्यात आले आहे . पीककर्ज वाटपामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँकेला असलेल्या ३७ कोटी ४ लाख रुपय कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे . यापैकी ११ लाख ३ हजार रुपये कर्ज वाटप करण्यात आले आहे . ज्याचा लाभ केवळ २५ शेतकऱ्यांना झाला आहे. 

 

तर व्यापारी बँकानी मात्र रब्बी हंगामात पीक कर्जवाटपाची गती वाढवली असल्याचे दिसते . या बँकाना असलेल्या एकूण १९७ कोटी ७० लाख रुपयाच्या कर्ज वाटपाच्या लक्षांकापैकी ३५ कोटी ६६ लाख ३५ हजार

रुपये रुपयाचे कर्जवाटप आत्तपर्यंत केले आहे .  ज्याचा लाभ ४ हजार ६६ शेतकऱ्यांना झाला बँकानी आहे . या बँकाची कर्ज वाटपाची टक्केवारी १८.०४ एव्हढी आहे . तर ग्रामीण बँकेने अद्याप एकाही एकूण शेतकऱ्यांना रब्बीचे कर्ज दिले नसल्याचे दिसते . वाटपाच्या या बँकेला ४० कोटी ४ लाख रुपये कर्ज वाटपाचे हजार उद्दिष्ट आहे .

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Only 13% loan disbursement for rabi crops in the district, banks indifference hingoli news