

Raju Navghare seeks urgent water release to save crops
Sakal
हिंगोली : हिंगोली, परभणी व नांदेड जिल्ह्यांतील खरीप हंगामातील पिकांना सध्या पावसाच्या खंडामुळे मोठा फटका बसत असून सोयाबीन, हळद, तूर, ऊस, कापूस, ज्वारी यांसह विविध पिके वाळण्याच्या स्थितीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सिद्धेश्वर व येलदरी धरणातून कालव्यामध्ये तातडीने पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार राजू नवघरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.