हिंगोली : जिल्ह्यात १६ शाळा सुरू करण्यास परवानगी

file photo
file photo
Updated on

हिंगोली : जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता शिक्षकांचे आरटीपीसीआर चाचण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत. त्याचप्रमाणे अनेक शाळांकडून संमती मिळत असल्याने जिल्ह्यातील १६ शाळा सुरू करण्याकरीता यापूर्वीच मान्यता दिली असताना लवकरच आणखी २० शाळांना मान्यता दिली जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शाळाच्या घंटा वाजणार पुन्हा वाजणार आहेत.

जिल्ह्यातील नक्वी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू करण्यासाठी शासनाने यापूर्वीच मान्यता दिली होती परंतु शिक्षकांची माध्यमिक आरटीपीसीआर चाचणी पूर्ण झाल्यानंतरच शाळा सुरू विद्यालय करण्याबाबतचा निर्णय घेतला जाणार अशी भूमिका  जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी घेतली होती.

त्यानुसार संपूर्ण शिक्षकांची आरटीपीसीआर चाचणी झाली असून माध्यमिक जवळपास ८८ शिक्षक पॉझिटिव्ह निघाले आहेत. त्यामुळे ज्या- माध्यमिक ज्या शाळांकडून सुरू करण्यासाठी संमती मिळत असल्याने  टप्पाटप्याने शाळा सुरू करण्याकरीता मान्यता दिली जात आहे.

त्या निमित्त पहिल्या टप्प्यात दोन डिसेंबर पासून हिंगोली  तालुक्यातील संत गजानन महाराज कनिष्ठ महाविद्यालय सवड, अन्नपूर्णा माध्यमिक महाविद्यालय कलगाव, पांडूरंग माध्यमिक माध्यमिक विद्यालय समगा, मिराताई माध्यमिक विद्यालय सवड, संत सेवालाल महाराज महाविद्यालय पळसोना. कळमनुरी तालुक्यातील केंब्रिज कनिष्ठ महाविद्यालय चुंचा, बालाजी विद्यालय वाई, सेनगाव तालुक्यातील सत्य गणपती माध्यमिक विद्यालय सरकळी, विद्यानिकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कोळसा, सर्वोदय विद्यालय खुडज, वसमत तालुक्यातील अनपूर्ण देवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आरळ, रमेश वरपुरडकर माध्यमिक विद्यालय कंरजाळा, चतुमुखी विनायक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय आसेगाव, औंढा नागनाथ तालुक्यातील इंदिरा गांधी कन्या उच्च विद्यालय जवळा बाजार या १६ शाळा सुरू करण्याकरीता जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी पी.बी.पावसे यांनी माध्यमिक परवानगी दिली आहे.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com