हिंगोलीत पेट्रोलने केली शंभरीपार; वाहनधारक त्रस्त

आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर घटले असताना देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध करामुळे सातत्याने इंधन दरात वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी इंधनाचे दर स्थिर होते.
petrol pump
petrol pump
Updated on

हिंगोली : पेट्रोलच्या दराने भडका उडाला (Hingoli Petrol rate) असून हिंगोलीत सोमवारी ( ता. १८ ) पेट्रोलची किमत शंभर रुपये १५ पैसे प्रतिलिटर झाली. मागच्या काही दिवसापासून पेट्रोलच्या किमतीत (petrol high price) दररोज वाढ होत आहे. यामुळे सर्वसाधारण वाहनधारक त्रस्त झाले आहेत. (Hingoli petrol has crossed hundreds; The vehicle owner suffers)

आंतरराष्ट्रीय इंधनाचे दर घटले असताना देखील केंद्र व राज्य सरकारच्या विविध करामुळे सातत्याने इंधन दरात वाढ होत आहे. मागच्या काही दिवसांपूर्वी इंधनाचे दर स्थिर होते. तर काही त्यात घट देखील झाली होती. मात्र काही राज्यात झालेल्या निवडणूकानंतर पेट्रोल व डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होत आहे.

हेही वाचा - चांगली बातमी : सुशिक्षित शेतकऱ्याने फळबागेच्या माध्यमातून साधला आर्थिक विकास

या वाढत्या किमतीने सर्वसामान्य नागरिकांना महागाईचा चटका बसत आहे. तेल कंपन्यांनी सोमवारी (ता. १८) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ केली आहे. त्यामुळे हिंगोलीत पेट्रोलची किमत प्रतिलीटर १००. १५ तर डिझेलची किंमत ९९. ६० पैसे प्रति लीटर झाली आहे. या दर वाढीचा चांगलाच फटका सर्व सामान्य नागरिकांना बसला आहे.

पेट्रोलबरोबर झालेल्या डिझेल वाढीमुळे शेतीच्या मशागतीची ट्रक्टरच्या सहाय्याने होणाऱ्या कामाचे भाव वाढले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. मागच्या वर्षी दीड हजार एकरी भाव होता. आता तो दोन हजार रुपये झाला आहे. पेट्रोल व डिझेलसह खाद्यतेल तसेच खताच्या भावात देखील चांगलीच वाढ झाल्याने नागरिकांसह शेतकरी देखील आर्थिक अडचणीत सापडले आहेत. मागच्या वर्षापासून कोरोनाच कहर असल्याने संचारबंदी लाँकडाऊन यामुळे कोणतेच व्यवसाय सुरळीत नाहीत. त्यात महागाई भडका वाढल्याने अडचणीत चांगलीच भर पडली असल्याचे चित्र जिल्हाभरात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune Beed Direct Railway Service Timetable Announced Train To Cover Journey In Seven Hours With Multiple Station Stops
Manoj Jarange Patil Hunger Strike Ends In Patoda Mumbai Protest Put On Hold Government Gets Three Months For Maratha Demands
Yuva Sena Workers Throw Ink at Forest Guard Over Delay in Action
Maratha Quota
Marathi News Esakal
www.esakal.com