Crime News: हिंगोली जिल्ह्यात धक्कादायक घटना; गर्भवती पत्नीच्या मृत्यूनंतर पतीने घेतला गळफास

Pregnant Woman Dies, Domestic Violence, Husband Suicide: हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात कौटुंबिक वादातून झालेल्या मारहाणीत चार महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर तिच्या पतीने आत्महत्या केली असून, महिलेची आईही मारहाणीत गंभीर जखमी झाली आहे.
A domestic dispute in Hingoli district leaves a pregnant woman dead, her mother seriously injured and her husband also dead.

A domestic dispute in Hingoli district leaves a pregnant woman dead, her mother seriously injured and her husband also dead.

sakal
Updated on: 

कळमनुरी: कौटुंबिक वादातून पतीने केलेल्या बेदम मारहाणीत चार महिन्यांच्या गर्भवती पत्नीचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना खरवड (ता. कळमनुरी) येथे उघडकीस आली. दरम्यान, जावयाच्या मारहाणीत सासू गंभीर जखमी झाली आहे.

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, खरवड येथील प्रभाकर पाईकराव यांनी आपली मुलगी दीपाली (वय २४) हिचा सहा महिन्यांपूर्वी धानोरा जहांगीर (ता. कळमनुरी) येथील विशाल डोंगरे यांच्यासोबत पुनर्विवाह लावून दिला होता. दीपालीची पहिली चार वर्षांची मुलगी तिच्या आजोळी राहत होती. पुनर्विवाहानंतर दीपाली धानोरा जहांगीर येथे सासरी आली होती. दरम्यान, तब्बेत बिघडल्याने विशाल डोंगरे हा दोन दिवसांपूर्वी उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com