esakal | Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस

Hingoli : हिंगोली जिल्ह्यात दमदार पाऊस, पहाटेपासून सुरूवात

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यात Rain In Hingoli District मागील दहा ते बारा दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचे गुरुवारी (ता.आठ) पहाटेपासून दमदार आगमन झाले. त्यामुळे सुकत असलेल्या पिकांना दिलासा मिळाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मागील चोवीस तासांत जिल्ह्यात २३. ९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दुपारी बारा वाजल्यापासून सूर्यदर्शन झाले नाही. जिल्ह्यात मागील चोवीस तासांत गुरुवारी सकाळी आठ वाजेपर्यंत २३.९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तालुकानिहाय झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा; हिंगोली तालुका २७.५०, कळमनुरी २७.८०, वसमत २३.४०, औंढा नागनाथ Audha Nagnath ११. ८०, सेनगाव Sengaon २४.५०. जिल्ह्यात Hingoli या वर्षी मृग नक्षत्रात झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या Sowing केल्या. त्यावर पिकांची उगवण झाली. मध्यंतरी पावसाने Rain उघडीप दिल्याने पिके सुकत होती. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची व्यवस्था आहे, अशांनी पिकांना पाणी देणे सुरू केले होते.hingoli rain updates heavy rain in district

हेही वाचा: तरुणाचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी फोडला हंबरडा...

मात्र कोरडवाहू शेतकरी Farmer पावसाच्या प्रतिक्षेत होते. दरम्यान, बुधवारी सायंकाळी कळमनुरी Kalamnoori व वसमत Vasmat तालुक्यातील काही गावांत पाऊस झाला, तर गुरुवारी पहाटेपासून जिल्ह्यात सर्व दुर पाऊस झाला आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत पावसाची रिमझिम सुरू होती. ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने सुर्यदर्शन देखील झाले नव्हते. या वर्षी मृग नक्षत्रात चांगला पाऊस झाला. मात्र आर्द्रा नक्षत्र कोरडे गेले. सोमवारपासून (ता.पाच) पुनर्वसु नक्षत्र सुरू झाले असुन या नक्षत्रात वातावरण बदल झाला आहे. बऱ्याच दिवसांच्या प्रतिक्षेनंतर या नक्षत्रात पावसाचे आगमन झाल्याने पिकांना जीवदान मिळाले असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. आता रखडलेल्या पेरण्याना देखील सुरुवात होईल असे शेतकरी सांगत आहेत.

loading image