esakal | Video- हिंगोली : कुरुंदा येथ़ील नदीला पूर, अनेक घरात पाणी शिरले
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

अतिवृष्टी मुळे सकाळी शुक्रवारी अनेक घरात पाणी शिरले असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते.

Video- हिंगोली : कुरुंदा येथ़ील नदीला पूर, अनेक घरात पाणी शिरले

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

कुरुंदा ( जिल्हा हिंगोली) : वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे गुरुवारी (ता. 17) ३ रात्री तीन वाजता झालेल्या अतिवृष्टी मुळे सकाळी शुक्रवारी अनेक घरात पाणी शिरले असून त्यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले होते. सकाळी पुर ओसरण्यास सुरुवात झाली आहे. मात्र गावकऱ्यांनी रात्र जागुन काढली.

वसमत तालुक्यातील कुरूंदा येथे गुरुवारी रात्री सुरू झालेला पाऊस मध्यरात्री धोधो बरसला यामुळे गावाजवळून वाहणाऱ्या जलेश्वर नदीला पुर आला या नदीचा गावाला वेढा आहे. तसेच नदीचे पात्र अरुंद असल्याने नदीचे पाणी गावात शिरले यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने गावकऱ्यांना रात्र जागुन काढावी लागली.

शेतातील पिकांची खरडा खरडी झाली

तसेच या पाण्याने मोठया प्रमाणावर शेतातील पिकांची खरडा खरडी झाली असून पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे कुरुंदा येथे पुराच्या पाण्याने वेढा घातला असून  गणेशनगर  आरामिशन, साईबाबा नगर, साठेनगर, श्रीवास्तव, लहुजी नगर, संत तुकाराम महाराज मंदिर आदी भागांतील घरात पुराचे पाणी शिरल्याने अनेकाचे धान्य, कपडे,संसारउपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा -  इसापुर धरणाचे अकरा दरवाजे उघडले, धरणाखालील गावांना सावधानतेचा इशारा

येथे २०१६ च्या ढगफुटी नंतर पुन्हा पूरचा फटका

नदीचे पात्र ओलांडून रस्त्याने पाणी वाहत होते.त्याच बरोबर दुर्गा माता मंदिरला पुरच्यां पाण्याने वेढा घातला होता. येथे २०१६ च्या ढगफुटी नंतर पुन्हा पूरचा फटका कुरुंदा वासीयांना बसला आहे. यावेळी देखील या नदीला मोठा पुर आला होता. त्यावेळी अनेक घरांचे नुकसान झाले तसेच शेतीचे देखील नुकसान झाले होते.  सध्या पुराचे पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे

loading image
go to top