esakal | हिंगोलीतील सुराणानगरात दरोडा; तलवारीचा धाक दाखवत सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास

बोलून बातमी शोधा

In Hingoli robbers broke the lock of a house and stole Rs 4 lakh}

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील राज्य राखीव दलात आर. व्ही. त्रिमुखे हे जवान कार्यरत आहेत.

हिंगोलीतील सुराणानगरात दरोडा; तलवारीचा धाक दाखवत सोन्या चांदीसह रोख रक्कम लंपास
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : शहराजवळ असलेल्या सुराणा नगरात राज्य राखीव दलाच्या जवानाच्या घराचे कुलूप तोडून दरोडेखोरांनी तलवारीच्या धाक दाखवून सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा चार लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना रविवारी (ता. सात) पहाटे दोन ते अडीचच्या दरम्यान घडली.

या बाबत मिळालेल्या माहितीनुसार येथील राज्य राखीव दलात आर. व्ही. त्रिमुखे हे जवान कार्यरत आहेत. त्यांचे सुराणा नगरात  घर असून येथे  त्यांचे आई - वडील, पत्नी, भाऊ राहतात. श्री. त्रिमुखे हे  कर्तव्यावर बाहेर जिल्ह्यात गेले आहेत. दरम्यान रविवारी पहाटे दहा ते बारा दरोडेखोर येथे आले त्यांनी परिसरातील अनेक घरांच्या बाहेरून कड्या लावल्या नंतर त्रिमुखे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून मधला दरवाजा तोडला व घरात प्रवेश केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

या आवाजामुळे घरातली मंडळी जागी झाली. या वेळी दरोडेखोरांनी तलवारी व कत्ती हातात घेऊन घरात प्रवेश केला. दरोडेखोरांनी त्रिमुखे यांच्या भावाचे हात बांधले. त्यानंतर त्यांचे आई - वडील, पत्नी व भाऊ यांच्या गळ्यावर तलवारी ठेवून आवाज करायचा नाही असे सांगितले. व महिलांच्या गळ्यातील दागिने काढून घेतले. तसेच दरोडेखोरांनी घरातील दोन कपाट फोडून त्यातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम ताब्यात घेऊन त्यांचे मोबाईल घेऊन पळाले. 

या घटनेमुळे त्रिमुखे कुटुंबीय भयभीत झाले नंतर त्यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. त्यानंतर येथील नागरिक घटनास्थळी आले. या घटनेची माहिती हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात दिली. माहिती मिळताच पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहायक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बळीराम बंदखडके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

येथे  दरोडेखोरांच्या काही वस्तू आढळून आल्यामुळे पोलिसांनी तातडीने श्वानपथकाला पाचारण केले.  तसेच ठसे तज्ञांनाही पाचारण केले आहे. दरम्यान जिल्हाभरात नाका बंदीचे आदेश देण्यात आले आहेत. दरोडेखोरांच्या शोधासाठी श्वान पथकाने घटनास्थळापासून काही अंतरापर्यंत माग काढला, पुढचा माग काढू शकला नाही .