esakal | हिंगोली : जिल्हा परिषदेत झिरो पेंडसीसाठी धावपळ, त्रिस्तरीय समितीमार्फत होणार तपासणी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

येथील जिल्हा परिषद व पाच ही पंचायत समिती मध्ये नागरिकांची व प्रशासकीय कामे विशिष्ठ कालमर्यादेत राहावीत यासाठी झिरो पेंडंसी अँड डेली डिस्पोजल कार्यक्रम

हिंगोली : जिल्हा परिषदेत झिरो पेंडसीसाठी धावपळ, त्रिस्तरीय समितीमार्फत होणार तपासणी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली :  झिरो पेंडसी अँड डेली डिस्पोजल अभियानांतर्गत जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये अभिलेखे वर्गीकरण करण्याची धावपळ सुरू आहे. त्रिस्तरीय समितीमार्फत सोमवारी (ता. १९ ) अभिलेख्यांची पाहणी केली जाणार आहे.

येथील जिल्हा परिषद व पाच ही पंचायत समितीमध्ये नागरिकांची व प्रशासकीय कामे विशिष्ठ कालमर्यादेत राहावीत यासाठी झिरो पेंडंसी अँड डेली डिस्पोजल कार्यक्रम अविरत पणे सुरु ठेवण्यासाठी  जिल्हा परिषदेचे सीईओ राधाबीनोद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत कुमार माळी, डॉ. मिलिंद पोहरे, गणेश वाघ, आत्मराम बोन्द्रे, डॉ शिवाजी पवार, डॉ. प्रवीनकुमार घुले, चंद्रकांत वाघमारे यांनी  महात्मा गांधी जयंती दिनापासून आपापल्या विभागात, सर्व पंचायत समिती कार्यालय, उपविभाग अभियान राबविण्यास सुरुवात केली आहे. ज्या विभागात कर्मचारी सहभाग घेत नाहीत त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

संकल्प अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्यात यांचा समावेश

संकल्प अभियानात उत्कृष्ट काम करणाऱ्या कार्यालयासह, अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरव केला जाणार आहे. संकल्प अभियानाचे परीक्षण करण्यासाठी त्रिस्तरीय समिती स्थापन केली असून यामध्ये अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार , उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, पाणी व स्वछता विभागाचे आत्मराम बोन्द्रे यांचा समावेश आहे.

स्वछता देखील नसल्याने सीईओ शर्मा कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले 

या समितीकडून अभिलेख्यांचे वर्गीकरण, कार्यालयीन स्वछता, संचिकांची नीट नेटकेपणा, व्यवस्थित बांधणी आदींची सोमवारी तपासणी करणार आहेत. त्यामुळे सर्वच विभागात मागील बारा दिवसापासून अभिलेख्यांचे 'अ ब क ड' वर्गीकरण करून व्यवस्थित बांधणी करण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. मागील आठवड्यात स्वतः सीईओ राधाबीनोद शर्मा, यांनी अचानक दोन चार विभागाची पाहणी केली असता सर्व अभिलेखे अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. तसेच स्वछता देखील नसल्याने सीईओ शर्मा कर्मचाऱ्यांना चांगलेच खडसावले होते. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सर्वच विभागात कर्मचारी अभिलेख्याचे वर्गीकरण करून बांधणी करण्याचे चित्र  होते.

संपादन-  प्रल्हाद कांबळे

loading image