

school Safety
sakal
हिंगोली: शाळांतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सुरक्षिततेसाठी शाळांत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानंतर काही शाळांत कॅमेरे बसविण्यात आले, मात्र जिल्ह्यातील अद्याप अनेक शासकीय, खासगी शाळा सीसीटीव्हीच्या ‘नजरे’बाहेर असल्याचे समोर आले आहे.
बदलापूरच्या घटनेनंतर शिक्षण विभागाने मागील सत्रात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सूचना दिल्या होत्या.