हिंगोली : आतापर्यंत वाचवले सात हजार साप!

हिंगोली येथील सर्पमित्र मुरली कल्याणकर यांची कामगिरी
Hingoli Seven thousand snakes saved by snake friend
Hingoli Seven thousand snakes saved by snake friend

हिंगोली : सापांविषयी समाजात अनेक गैरसमज आहेत. भीतीही आहे. त्यामुळे साप दिसताच त्याला मारणारे अनेकजण आहेत. पण, सगळेच साप विषारी नाहीत. उलट विषारी सापाच्या प्रजाती मोजक्याच आहेत. या बाबत येथील मुरली कल्याणकर मागील अनेक वर्षांपासून कृतिशील जनजागृती करीत आहेत. त्यांनी आतापर्यंत सात हजार साप पकडून त्यांना सुखरूप जंगलात सोडून दिले आहे.

कल्याणकर हे वयाच्या पंधरा वर्षांपासून साप पकडतात. शहरात सर्पमित्र म्हणून त्यांची ओळख आहे. शहरात साप निघाल्यानंतर पहिला कॉल त्यांना केला जातो. अनेक वर्षांपासून ते निःशुल्क सेवा देत आहेत. जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनाही त्यांनी सापांविषयी मार्गदर्शन केले आहे. आतापर्यंत त्यांनी सात हजारांपेक्षा अधिक साप पकडले. यात दोनशे जातीच्या सापांचा समावेश आहे.

दरवर्षी सापांसोबत फ्रेंडशिप डेसुद्धा ते साजरा करतात. शाळा-महाविद्यालयांत गेल्यावर साप हाताळण्याचे प्रात्यक्षिक दाखवून ते मुलांची भीती दूर करतात. साप शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे त्याला मारून न टाकता सापाला पकडून जंगलात सोडून द्या; असे आवाहन ते करतात. त्यांनी चला सापाला वाचवू ही मोहीम सुरू केली आहे.

सापाने दंश केल्यावर घाबरून जाऊ नका; मंत्राने विषबाधा कमी होत नाही. त्यामुळे डॉक्टरकडे जावे, असे सल्लाही ते देतात. यासाठी डॉ. संजय नाकाडे, श्रीधर कंदी यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाल्याचेही त्यांनी सांगितले. शिवाय त्यांनी विजयराज पाटील, बाळू ढोके, ओम जाधव, सलीम जादूगार, जावेद भाई, आनंद चोपडे, करण सुतारे, विशाल सरकटे, हर्षद पठाण, रवी कांबळे, स्वप्निल परसवाळे, विजू शिंदे, तानाजी जाधव, सचिन पाटील, संदीप शिंदे, वैभव कपाटे आदी सर्पमित्रसुद्धा केले आहेत.

लहानपणापासून साप पकडण्याची कला अवगत आहे. साप हा आपला शत्रू नसून मित्र आहे. नागरिकांनी न घाबरता सापांना मारण्याऐवजी जाऊ द्यावे. साप हा मासांहारी असल्याने त्याला दूध पाजू नये.

- मुरली कल्याणकर, सर्पमित्र

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com