esakal | उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद
sakal

बोलून बातमी शोधा

marathwada

Hingoli : उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ कडकडीत बंद

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : हिंगोलीत उत्तर प्रदेशातील लखिमपुर येथील घटनेच्या निषेधार्थ सोमवारी ता. ११ कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यापाऱ्यांनी प्रतिष्ठाने बंद ठेवली होती. महाविकास आघाडीतर्फे जिल्हाधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपती भगतसिंह कोश्यारी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले.

यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार संतोष बांगर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय बोंढारे, रिपाई गवई गटाचे प्रदेश सरचिटणीस मधुकर मांजरमकर, रिपाई कवाडे गटाचे मराठवाडा अध्यक्ष गणेशराव पडघन गुरुजी, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष शेख खलील बेलदार, माजी आमदार संंतोष टारफे, रिपाई कवाडे गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भिसे, तसेच मिलींद उबाळे, शामराव जगताप, माधव कोरडे, जावेदराज, दतराव नवघरे, राम कदम, बापुराव बांगर, बी. डी. बांगर, विशाल इंगोले, डॉ. राजेश भोसले आदींची उपस्थिती होती.

दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, उत्तर प्रदेशातील लखीमपुर खीरी येथे भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांची मुलाने आंदोलन करत्या शेतकऱ्यांचा अंगावर वाहन घालून चार शेतकऱ्यांची निर्दयपणे हत्या केली. या घटनेमध्ये सहा ते सात शेतकरी जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. सदरील प्रकार म्हणजे शेतकऱ्यांचे न्याय मागण्यासाठी सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आहे. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी महा विकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला हिंगोली जिल्ह्यातील मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या प्रकरणातील दोर्षीवर कडक कारवाई करावी व शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी विनंती करण्यात आली आहे.

दरम्यान बंद संदर्भात महाविकास इघाडीने दोन दिवसापूर्वी व्यापाऱ्यांना बंद मध्ये सहभागी होण्यासाठी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्याला शंभर टक्के प्रतिसाद मिळाला आहे. हिंगोली शहरात कडकडीत बंद होता.

loading image
go to top