
कळमनुरी येथील 35 वर्षीय पांडुरंग पतंगे हा मागील दोन वर्षांपूर्वी घरांमधून निघून गेला होता त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध चालविला होता मात्र त्याचा कुठेही ठावठिकाणा आढळून आला नाही याप्रकरणी त्याच्या आईने कळमनुरी पोलिस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार केली होती
कळमनुरी (जिल्हा हिंगोली ) : दोन वर्षापूर्वी घरातून निघून गेलेल्या व विस्मरण झालेल्या युवकाची कुटुंबापासून ताटातूट झाली होती. मात्र कळमनुरी पोलिसांनी पुढाकार व शोध मोहीम सुरू ठेवून उत्तर प्रदेशामधील शेतकरी कुटुंबाने आसरा दिलेल्या या युवकाला शनिवार (ता. सात) वापस आणून त्याच्या आईशी भेट घडवून दिली याकामी बँक शाखा अधिकारी म्हणून उत्तर प्रदेशात कार्यरत असलेल्या नंदुरबार येथील महेश पठाडे यांची मोलाची भूमिका ठरली.
कळमनुरी येथील 35 वर्षीय पांडुरंग पतंगे हा मागील दोन वर्षांपूर्वी घरांमधून निघून गेला होता त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध चालविला होता मात्र त्याचा कुठेही ठावठिकाणा आढळून आला नाही याप्रकरणी त्याच्या आईने कळमनुरी पोलिस ठाण्यात आपला मुलगा हरवला असल्याची तक्रार केली होती त्याला केवळ त्याच्या आईचा मोबाईल नंबर पाठ असल्यामुळे तो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणावरील कुणी मोबाईल वरून बोलण्याची संधी दिली तरच त्याच्या आईशी बोलणे व्हायचे मात्र अनेक वेळा भाषेचा अडथळा निर्माण झाला या काळात तो बेंगलोर येथून झाशी येथे पोहोचला
हेही वाचा - यंदाच्या वर्षी थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता
उत्तर प्रदेशामधील शहाजानपुर जवळच असलेल्या महीकापूर येथील महाविर सिंह यादव या शेतकरी कुटुंबाने त्याला आसरा दिला या प्रकाराची माहिती त्या भागात पोहोचली योगायोगाने शहाजानपूर येथील बँक ऑफ बडोदा शाखेत शाखा व्यवस्थापक असलेल्या नंदुरबार येथील महेश पठाडे यांना माहिती मिळाली त्यांनी पांडुरंग ला आपल्या गावी जाण्यासाठी पुढाकार घेतला महेश पठाडे व कळमनुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे यांचे याप्रकरणी बोलणे झाले.
त्यानंतरही पोलीस निरीक्षक रणजित भोईटे यांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश कलासागर यांची परवानगी घेत पोलीस कर्मचारी सय्यद अली व श्री पोटे यांना स्वतंत्र वाहन घेऊन गुरुवार तारीख 5 ला शहाजानपुर उत्तर प्रदेश कडे रवाना केले होते पोलीस कर्मचारी श्री अली यांनी शहाजनपुर येथे पोहोचून नंदुरबार येथील रहिवासी महेश पठाडे, व राम कृष्ण कटिहार यांची भेट घेत शहाजानपूर जवळ असलेल्या महीकापूर येथे पांडुरंग पतंगे याला आसरा दिलेल्या यादव कुटुंबाची भेट घेऊन त्यांना माहिती दिली.
येथे क्लिक करा - मुदखेड : पिस्तुलचा धाक दाखवून सराफाला लुटणारे पोलिस कोठडीत
दरम्यान शनिवार (ता. सात ) कळमनुरी पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक रणजित भोईटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीनिवास रोयलावार, श्री सिद्धीकी, कर्मचारी सय्यद अली, श्री पोटे ,शिवाजी पवार, गणेश सूर्यवंशी, विकी ऊरेवार यांच्या उपस्थितीत पांडुरंग पतंगे याला त्याच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले मुलाला विस्मरण झाल्यामुळे भविष्यात आपल्या मुलाची भेट होणार नाही हे गृहीत धरलेल्या आईची कळमनुरी पोलिसांच्या प्रयत्नांमुळे मुलाची भेट झाली मागील दोन वर्षापासून मुलापासून दुरावलेल्या पांडुरंगच्या आईच्या डोळ्यात आनंदाश्रू व पोलिसांनी केलेल्या मदतीच्या भावने विषयी कृतज्ञता व्यक्त केली.
संपादन - प्रल्हाद कांबळे