हिंगोली : माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत जिल्ह्यात पावणेदोन लाख कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण

राजेश दारव्हेकर
Wednesday, 30 September 2020

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून ०८ लाख ८६ हजार ८९  व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५८९  कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता १०३  पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.

हिंगोली :  कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी तसेच मृत्यूदर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेंतर्गत एक हजार २२२ पथकामार्फत एक लाख ७५ हजार २३५  कुटुंबाचे सर्वेक्षण पूर्ण करुन ७४  टक्के उद्दिष्ट साध्य करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

या सर्वेक्षणामध्ये प्रत्येक कुटुंबातील मिळून ०८ लाख ८६ हजार ८९  व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये ५८९  कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता १०३  पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांना उपचारासाठी संदर्भीत करण्यात आले आहेत. तसेच सारी आजाराची १४८  रुग्ण तर मधुमेहाची तीन हजार ७०३ , उच्च रक्तदाबाची सहा  हजार ७९२  किडनी आजाराची ५५, लिव्हर आजाराचे १७ व इतर आजाराचे तीन  हजार ६१०  रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. 

हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय तपशील पुढील प्रमाणे आहे. 

हिंगोली तालुक्यात २०० पथकांमार्फत ४६  हजार ४१९ कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून दोन लाख ३९  हजार ६४१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये मधुमेहाची ५७१ तर उच्चरक्तदाबाची ५९२ आणि इतर आजाराची एक  हजार ४४९  रुग्ण आढळून आली आहेत. वसमत तालुक्यातील २४४ पथकांमार्फत ४३ हजार २६२  कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून दोन  लाख ४६ हजार ९२२ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  

या तपासणीमध्ये १५८ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ३७  पॉझीटीव्ह

या तपासणीमध्ये १५८ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ३७  पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची दोन रुग्ण तर मधुमेहाची एक हजार ०३९, उच्चरक्त दाबाची तीन हजार ६१८ किडनी आजाराची १४ लिव्हर आजाराचे ११ व इतर आजाराचे एक  हजार १११ रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे. 

कळमनुरी तालुक्यातील १९१ पथकांमार्फत

कळमनुरी तालुक्यातील १९१ पथकांमार्फत २७ हजार ८०८ कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून एक लाख ३५  हजार ४३१ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये ९३ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता २२ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची ११३ रुग्ण तर मधुमेहाची ६४३, उच्च रक्त दाबाची  एक हजार ०२५  किडनी आजाराची एक व इतर आजाराचे २४१ रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत. 

सेनगांव तालुक्यातील ६५ पथकांमार्फत

सेनगांव तालुक्यातील ६५ पथकांमार्फत ३१ हजार ५६८ कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून एक लाख ४९  हजार ४८७ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये २४४ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ४०  पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच सारी आजाराची ३३ रुग्ण तर मधुमेहाची ३४६, उच्चरक्त दाबाची ४७१, किडनी आजाराची ३४ लिव्हर आजाराचे दोन व इतर आजाराचे २३० रुग्ण या तपासणीत आढळून आली आहे आणि औंढा तालुक्यातील ५२२ पथकांमार्फत २६ हजार १७७ कुटुबांचे सर्वेक्षण करण्यात आले असून  एक  लाख २३ हजार ६०८ व्यक्तींची तपासणी करण्यात आली आहे.  या तपासणी मध्ये ९४ कोविड संशयित रुग्णांची तपासणी केली असता ०४ पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तसेच मधुमेहाची एक हजार १०४, उच्चरक्त दाबाची एक हजार ०८६, किडनी आजाराची सहा लिव्हर आजाराचे चार व इतर आजाराचे ५७९ रुग्ण या तपासणीत आढळून आली आहेत.

या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट

‘कोविड मुक्त महाराष्ट्र’ ही जनजागरण मोहिम राज्यभर शासनाच्या वतीने राबविण्यास सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ ही मोहिम राबविण्यात येत आहे. जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविल्या जाणा-या या मोहिमेत गावे, तांडे, वस्त्या, प्रभागातील प्रत्येक घराला भेट देण्यासाठी आरोग्य पथके तयार करण्यात आली आहेत. खोकला, ताप, दमा लागने अशी कोविड सदृश्य लक्षणे असणा-या रुग्णांना जवळच्या फिव्हर क्लिनिकमध्ये संदर्भीत केले जात आहे तसेच विविध माध्यमांद्वारे जनजागृती करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शिवाजी पवार यांनी दिली आहे.

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: A survey of 1.75 lakh families in the district has been completed under the 'My Family, My Responsibility' campaign Hingoli news