Hingoli : आई-बाबा, प्लिज तंबाखू नका खाऊ!

चिमुकल्यांच्या विनंतीमुळे हिंगोली तालुक्यातील लोहगाव झाले तंबाखूमुक्त
तंबाखूमुक्त
तंबाखूमुक्त sakal

हिंगोली : तंबाखूमुक्त गावासाठी तालुक्यातील लोहगाव येथील जिल्हा परिषदेने शाळेने पुढाकार घेतला आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकांनी तंबाखूचे दुष्पपरिणाम सांगितले. परिणामी, आता हे चिमुकले विद्यार्थी घरी गेल्यानंतर आई-बाबा, काका-काकू-आजी-आजोबा, मोठा भाऊ यांना तंबाखू खाऊ नका, अशी गळ घालत आहेत. त्यामुळे आता हे गाव तंबाखूमुक्त झाले असून, तसा फलक प्रत्येक घराच्या दर्शनी भागात लावला आहे.

तंबाखू म्हणजे हळुवार विषच आहे. त्यामुळे मुखाचा कर्करोग होऊ शकतो, हे माहीत असतानाही अनेकजण तंबाखू खातात. तंबाखू खाऊ नये, यासाठी शासन वेगवेगळ्या पातळीवर जागृतीही करीत आहे.

तंबाखूच्या पॅकिंगवर त्याचे दुष्परिणामही छापले जात आहेत. तरीही तंबाखू खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. ही संख्या केवळ कमी होऊन चालणार नाही तर कुणीच तंबाखू खाऊ नये, यासाठी लोहगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक दिलीप धामणे यांनी गावात जणू चळवळच उभी केली आहे.

त्यांच्या प्रयत्नाने लोहगाव शाळेला तंबाखूमुक्त म्हणून सलग दुसऱ्यांदा बहुमान मिळाला. पण, हे कार्य त्यांनी एवढ्यावरच थांबवले नाही तर गावातील प्रत्येक घर तंबाखूमुक्त व्हावे, यासाठी त्यांनी कृतिशील जनजागृती केली. त्यांच्या मार्गदर्शनात शाळेतील चिमुकले विद्यार्थी स्वतःच्या व शेजारच्या घरांमध्ये प्रबोधन करत आहेत.

याचाच दृश्य परिणाम म्हणून आता लोहगावमध्ये घराघरावर ‘तंबाखूमुक्त घर’ असा फलक पाहायला मिळत आहे. यासाठी शिक्षक धामणे यांना शिक्षणाधिकारी संदीपकुमार सोनटक्के, गटशिक्षणाधिकारी संगीता जाधव यांचे सहकार्य मिळाले.

हे आहेत दुष्परिणाम

तंबाखूच्या सेवनाने मानवी शरीरावर अनेक दुष्परिणाम होतात. त्यात प्रामुख्याने कॅन्सर म्हणजेच कर्करोग होतो. यात तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफुसाचा, घशाचा, पोटाचा, किडणीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात.

९० टक्के फुप्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे. तंबाखूमुळे छातीत दुखणे, हृदयविकार झटका येणे, रक्तवाहिन्यांचे विकार इत्यादी रोग जडतात. जर धूम्रपान जास्त केले तर टीबीसुद्धा होऊ शकतो. तंबाखू शरीरातील धमण्यांच्या पापूद्र्याला नुकसान पोचवतात.

हाही होतो परिणाम

  • तंबाखूच्या सेवनामुळे ताकद कमी होते

  • व्यक्तीची सहनशीलता ढासळते.

  • तंबाखू सेवनाने तोंडाची, केसांची दुर्गंधी

  • डोळ्यांखाली काळेपणा येतो

  • दातांना इजा पोचते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com