
हिंगोली: हिंगोली तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींमध्ये गुरुवारी (ता. तीन) सरपंचपदाची आरक्षण सोडत उपविभागीय कार्यालयात झाली. तालुक्यातील १११ ग्रामपंचायतींपैकी ५६ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव आहेत. यामुळे तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींमध्ये महिलाराज असणार आहे. आता कारभारी कारभारणीसाठी निवडणूक मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत.