esakal | हिंगोली : जिल्ह्यात २२१ अंगणवाड्या झाल्या बोलक्या, एक समान झाली रंगरंगोटी
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी व अंगणवाडी बोलक्या करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आजपर्यंत २२१ अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्यात आली आहे.

हिंगोली : जिल्ह्यात २२१ अंगणवाड्या झाल्या बोलक्या, एक समान झाली रंगरंगोटी

sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : जिल्ह्यातील २२१ अंगणवाड्यामध्ये एक समान रंगरंगोटी करुन या अंगणवाड्या बोलक्या झाल्या आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातुन जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांची एकसमान रंगरंगोटी व अंगणवाडी बोलक्या करण्याचे काम सुरु आहे. यामध्ये आजपर्यंत २२१ अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करण्यात आली आहे. यामध्ये हिंगोली तालुका ५८ व सेनगाव ५३ अंगणवाडी केंद्राना रंगरंगोटी करुन आघाडी घेतली आहे.

या सर्व अंगणवाडी केंद्रांना रंगरंगोटी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबिनोद शर्मा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंतकुमार माळी, डॉ. मिलिंद पोहरे, गणेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व गटविकास अधिकारी, सर्व पर्यवेक्षिका व ग्रामसेवक आदींनी पुढाकार घेतला. 

येत्या आठवड्यात पुर्ण अंगणवाडी केंद्राना एकसमान रंगरंगोटी केली जाणार आहे. तसेच एकसमान रंगरंगोटी झाल्यानंतर महाराष्ट्रात हिंगोली हा असा नाविन्यपूर्ण विक्रम करणारा पहिला जिल्हा असणार असल्याचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले. या रंगरंगोटीमुळे महिला बालकल्याण विभागात सेविका मदतनीस, अंगणवाडीची बालके व पालक वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आतापर्यंत रंगरंगोटी व बोलक्या झालेल्या अंगणवाडी केंद्रांत हिंगोली ५८, सेनगाव ५३,
औंढा नागनाथ ३७, कळमनुरी बाळापूर ३६, वसमत ३७ एकुण २२१ अंगणवाडीचा समावेश आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

loading image