हिंगोली : पुन्हा तीन रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णांची कोरोनावर मात मात्र सारीच्या आजाराने एकाचा मृत्यू 

राजेश दारव्हेकर
Sunday, 19 July 2020

त्यामुळे रुग्ण बाधितांची संख्या ८८ वर पोहचली असून सागद येथील वीस वर्षीय तरुणाचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली.

हिंगोली : जिल्ह्यात शनिवारी (ता. १८) रात्री दहा वाजता प्राप्त अहवालानुसार तीन कोरोना रुग्णाची नव्याने भर पडली तर पाच रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे रुग्ण बाधितांची संख्या ८८ वर पोहचली असून सागद येथील वीस वर्षीय तरुणाचा सारीच्या आजाराने मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीवास यांनी दिली.

सेनगाव क्वारंटाइन सेंटर अंतर्गत शनिवारी नव्याने तीन रुग्ण आढळून आले आहेत. यात एक २७,२८,२५ वर्षाच्या तरुणांचा समावेश असून हे तिन्ही रुग्ण कोविड च्या संपर्कातील व्यक्ती असल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच कळमनुरी येथील डेडीकेटेट हॉस्पिटल येथील दोन महिन्याची मुलगी बरी झाली आहे. ती शेवाळा येथील आहे. तर दुसरीकडे जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वॉर्ड येथील शुक्रवार पेठ वसमत येथील दोन रुग्ण बरे झाल्याने घरी सुट्टी देण्यात आली आहे. तर सेनगाव क्वारंटाइन अंतर्गत भरती असलेले वैतागवाडी येथील दोन रुग्ण बरे झाले आहेत. शनिवारी एकूण पाच कोविड रुग्ण बरे झाल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. तर नव्याने तीन रुग्णाचा समावेश आहे.

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यन्त ३८७ रुग्ण आढळून आले 

जिल्ह्यात कोरोनाचे आतापर्यन्त ३८७ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २९९ रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजमितीला ८८ कोरोना बाधित रुग्णावर उपचार सुरु असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले. जिल्हा सामान्य रुग्णालय आयसोलेशन वॉर्ड अंतर्गत ३० रुग्णांना भरती करण्यात आले आहे. यामध्ये. रिसाला एक, गांधी चौक एक, जीएमसी एक, धूत हॉस्पिटल एक, ब्राह्मण गल्ली वसमत एक,पेडगाव एक, शुक्रवार पेठ आठ, नव्हलगव्हाण एक, तालाब कट्टा तीन, दौडगाव दोन, गवळीपुरा एक, पेन्शनपुरा एक, अंजनवाडी एक, सेनगाव एक, जयपूरवाडी एक ,नवा मोंढा हिंगोली एक, कासारवाडा एक, आझम कॉलनी एक,पलटण एक, नारायणनगर एक, अशोक नगर एक, यांचा समावेश आहे. 

हेही वाचा - नांदेडात कोरोनाचे तांडव : शनिवारी ९४ बाधीत, सात रुग्ण बरे, एकाचा मृत्यू, संख्या पोहचली ८६९ वर

सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नाही

तर वसमत येथील डेडीकेटेट कोअर सेंटर येथे २१ रुग्ण भरती असून यात जयनगर एक, वापटी एक, शुक्रवार पेठ सात, स्टेशन रोड तीन, सोमवार पेठ एक, सम्राट नगर पाच, अशोकनगर एक, गणेशपेठ एक, पारडी एक, गुलशन नगर एक, बहिर्जी नगर एक यांचा समावेश आहे.
तसेच कळमनुरी येथे कोरोना सेंटर मध्ये  एकूण चार  रुग्णावर उपचार सुरु असून, नवी चिखली तीन,नांदापूर एक, यांचा समावेश आहे. याशिवाय लिंबाळा अंतर्गत कोरोना सेंटर येथे २९ रुग्णावर उपचार सुरु आहेत. यामध्ये तालाब कट्टा एक, भांडेगाव एक, हनवतखेडा एक, कळमकोंडा चार, पेडगाव    चौदा ,रामा देऊळगाव पाच, पहेनी दोन, माळधामणी एक यांचा समावेश आहे.सेनगाव येथे बस स्टँड येथील तिघांचा समावेश असून रुग्णावर उपचार सुरु आहेत.या सर्वांची प्रकृती ठीक असून कोणतेही गंभीर लक्षणे दिसून येत नसल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

आजघडीला ८२७ रुग्ण भरती असून, ३९० जणांचे अहवाल येणे बाकी

जिल्ह्यात गावपातळीवर तसेच क्वारंटाइन सेंटर अंतर्गत ६२८४ व्यक्तींना भरती करण्यात आले होते. त्यापैकी ५५५३ व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.५४४१ व्यक्तींना घरी सुट्टी देण्यात आली आहे. आजघडीला ८२७ रुग्ण भरती असून, ३९० जणांचे अहवाल येणे बाकी आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालयातील भरती असलेल्या रुग्णा पैकी चार रुग्णांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सिजन चालू आहे. तसेच दोन रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बाय प्याप मशीनवर ठेवले आहे. तसेच सहा रुग्णांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले .तसेच आज आयसोलेशन       वॉर्डात एक सारीच्या आजार असलेला वीस वर्षीय पुरुष राहणार सागद येथील असून त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉ. श्रीवास यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Three patients tested positive again, five patients overcome corona but one died due to Sari disease hingoli news