हिंगोली : येळी येथे निवडणूक कारणावरुन दोन गटात मारहाण, परस्परविरुद्ध गुन्हा दाखल

राजेश दारव्हेकर
Sunday, 17 January 2021

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील येळी येथे निवडणूक कारणांमुळे शुक्रवारी (ता. १५) दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी केल्याने १९ जणावर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

हिंगोली : तालुक्यातील येळी येथे दोन गटात निवडणूक कारणावरून मारहाण झाल्याची घटना घडली असुन परस्पर तक्रारीवरुन १९ जणाविरुध्द शनिवारी (ता. १६) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिंगोली तालुक्यातील येळी येथे निवडणूक कारणांमुळे शुक्रवारी (ता. १५) दोन गटात मारहाण झाल्याची घटना घडली दोन्ही गटाकडून परस्पर तक्रारी केल्याने १९ जणावर बासंबा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

यात विठ्ठल दिंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बबन शेळके, गणपत शेळके, प्रकाश दिंडे, आनंदराव मदगे, भैय्या मदगे, विष्णू मदगे, गणेश मदगे, राजु मदगे, योगेश मदगे, पवन मदगे, ज्ञानेश्वर दिंडे, विशाल दिंडे सर्व राहणार येळी यांनी शुक्रवारी दुपारी एक वाजता जयवंत दिंडे यांच्या घरासमोर गैरकायद्याची मंडळी जमवून तू आमच्या उमेदवाराविरुद्ध तुझा भाऊ उभा  का केला आहे म्हणून घरासमोर पडलेल्या विटाने डोक्यात मारून जखमी केले तसेच भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मुलांस विष्णू मदगे याने मारहाण केली इतरांनी लाथा बुक्यानी मारहाण केली विठ्ठल दिंडे व साक्षीदारास मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली अशी फिर्याद दिली यावरून बारा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचानांदेड येथे आज होणाऱ्या पतंग महोत्सवासाठी स्पर्धक तयार

तसेच गणेश मदगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन  शुक्रवारी दुपारी एक वाजता जयवंत दिंडे यांच्या घरासमोर गणेश मदगे मतदान करण्यास जात असताना मतदान केंद्राजवळील शंभर मिटर अंतरावर जास्त गर्दी झालेली पाहून  गैरकायद्याची मंडळी जमवून गणेश दिंडे, विठ्ठल दिंडे, संदीप दिंडे, गजानन दिंडे, नितीन दिंडे, जयवंत दिंडे, कुंडलिक हुंगने, सर्व राहणार येळी यांनी शिवीगाळ करून तुम्ही आमच्या उमेदवारांच्या विरुद्ध प्रचार का केला असे म्हणून तेथे पडलेल्या विटानी मारहाण केली. तसेच साक्षीदार शुभम यास संदीप दिंडे याने विट फेकून मारुन जखमी केले साक्षीदार योगेश मदने यास गजानन दिंडे यास विट फेकून मारुन जखमी केले विष्णू मदगे याचा  गजानन दिंडे याने चावा घेतला या सर्वांनी जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या या कारणावरून गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक आर, एच, मलपिलू  करीत आहेत.

 

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Two groups beaten up for election reasons in Yeli, case filed against each other hingoli news

Tags
टॉपिकस
Topic Tags: