हिंगोली : बोल्डा येथे अज्ञात आजाराने दोनशे कोंबड्या दगावल्या

file photo
file photo

हिंगोली : बोल्डा ता. कळमनुरी येथे बुधवार (ता. २७) अज्ञात रोगाने दोनशे कोंबड्या दगावल्याने खळबळ उडाली आहे. या बाबत पंचनामा करून रोगाचे निदान करून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे.

मागच्या काही दिवसांपासून बर्ड फ्युल आजाराने पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत. परभणी जिल्ह्यात काही भागात या रोगाने कोंबड्या दगावल्याचे निदान झाले त्यानंतर कळमनुरी तालुक्यातील पिंपरी खुर्द गावात देखील हा रोग पसरल्याने येथे देखील कोंबड्या दगावल्या होत्या त्या कोंबड्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठविले असता बर्ड फ्यु ची लागन झाल्याचे निदान करण्यात आले. 

यामुळे पिंपरी येथील कोंबड्या नष्ट करण्यात आल्यानंतर कळमनुरी तालुक्यातील पोतरा येथेही अज्ञात रोगाने कोंबड्या दगावल्या आता याच तालुक्यातील बोल्डा गावातील सखाराम विनकर व तुकाराम विनकर यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात कोंबड्या आहेत. मागच्या दोन दिवसापासून अज्ञात रोगाने कोंबड्या दगावण्याचे प्रमाण वाढले आहेत. आतापर्यंत या दोघांच्या प्रत्येकी दोनशे कोंबड्या दगावल्या आहेत. यामुळे या शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून याची पाहणी करून पंचनामा करावा व नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जात आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com