Hingoli : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Santosh Bangar
Hingoli : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

Hingoli : शिवसेना आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

हिंगोली : शिवसेना आमदार संतोष बंगार (Santosh Bangar) यांच्याविरुद्ध औंढा नागनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. औंढा नागनाथ नगरपंचायत निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान सुरु असताना प्रभाग क्रमांक पाचमधील नागनाथ कनिष्ठ महाविद्यालयातील मतदान केंद्रात अनधिकृत प्रवेश करुन मतदारांवर प्रभाव पडेल असे वर्तन केले. यावेळी बांगर (Hingoli) यांच्याबरोबर साधारण १० ते १५ कार्यकर्ते होते. यामुळे मतदान केंद्र अध्यक्ष तथा आमदरी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक दयानंद संभाजी कल्याणकर यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंदविण्यात आला आहे. (Hingoli Updates Crime Against Flied Against Shiv Sena MLA Santosh Bangar In Aundha Nagnath)

सदरील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे सांगून भाजप आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी आमदार संतोष बांगर यांच्या गुन्हा (Aundha Nagnath Municipal Council Election) दाखल करण्याची मागणी केली. तसेच प्रभाग पाचमधील निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :Hingoli