हिंगोली : दाळीसह भाजीपाल्याने ओलांडली शंभरी, सर्वसामान्यांचे अर्थकारण बदलले

राजेश दारव्हेकर
Wednesday, 21 October 2020

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यावर एक ते दोन वेळेस पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मूग, ऊडीद या दाळवर्गीय पिकाची पेरणी केली मात्र या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर झाला नसल्याने या पिकांचे नुकसान झाले.

हिंगोली : यावर्षी जिल्ह्यात सुरवातीला अपुरा पाऊस व त्यानंतर झालेल्या अतिवृष्टीने दाळवर्गीय पिकासह भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर झाला आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थकारण बदलले आहे.

यावर्षी पावसाळा सुरू झाल्यावर एक ते दोन वेळेस पडलेल्या पावसावर शेतकऱ्यांनी मूग, ऊडीद या दाळवर्गीय पिकाची पेरणी केली मात्र या पिकाच्या वाढीसाठी आवश्यक असलेला पाऊस वेळेवर झाला नसल्याने या पिकांचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांनी दुबार पेरणी केली मात्र त्यानंतर अतिवृष्टीने या पिकाचे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांना पोळ्याच्या वेळी आर्थिक आधार देणार्या या पिकांचे नुकसान झाले. 

हेही वाचाहिंगोलीत नऊ पोलिस कर्मचाऱ्यांना फौजदारपदी पदोन्नती 

शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली मात्र अतिवृष्टीचा फटका

त्यानंतर भाजीपाला उत्पादन शेतकऱ्यांना देखील अडचणींना सामोरे जावे लागले हंगामी भाजीपाला घेणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजीपाला पिकांची लागवड केली मात्र अतिवृष्टीचा फटका या पिकाला बसला यामुळे सद्यस्थितीत बाजारात जेवणातील नियमित लागणार्या दाळीचे भावाने शंभरी पार केली आहे. 

कोथिंबीर दहा रुपये पन्नास ग्राम

यात मुगदाळ १२० ते १४०, उडीद दाळ १०० ते १२०, मसुरदाळ ८० ते ९०, चनादाळ ७० ते ८०, तुरदाळ १०० ते ११० रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे.  तसेच भाजीपाला पिकांचे देखील भाव गगनाला भिडले आहेत. हिरवी मिरची, शेवगा, पत्ताकोबी, फुलकोबी शंभर रुपये किलो, टमाटे साठ, बटाटे सतर. कांदे साठ, लसन दिडशे, भेंडी साठ रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे. तर पालक , मेथी जुडी पंचवीस रूपये कोथिंबीर दहा रुपये पन्नास ग्राम या प्रमाणे विकली जात आहे. यामुळे सर्व सामान्य नागरिकांचे अर्थकारण बदलले आहे. बाजारात येणारी भाजीपाला पिकाची आवक घटल्यामुळे त्याचा भाजीपाला विक्रीवर परिणाम होऊन दर वाढल्याचे विक्रेते ज्ञानेश्वर काळे यांनी सांगितले.

संपादन- प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: Vegetables including pulses have crossed the 100 mark, the economy of all has changed hingoli news