

Hingoli News
esakal
हिंगोली: जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून वातावरणात होणारे कमालीचे बदल आणि ढासळलेली स्वच्छता यामुळे हिंगोली जिल्ह्याला ‘व्हायरल फिव्हर’चा (विषाणूजन्य ताप) मोठा विळखा बसला आहे. कधी कडक ऊन, तर कधी ढगाळ वातावरण आणि रात्रीचा गारवा अशा विचित्र हवामानामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तीव्र ताप, सर्दी-खोकला यासोबतच डेंगीसदृश लक्षणांचे रुग्ण वाढल्याने संपूर्ण जिल्हा सध्या तापाने फणफणल्याचे चित्र दिसत आहे.