हिंगोलीत स्वच्छ सर्वेक्षणतंर्गत रंगविलेल्या भिंतीही झाल्या बोलक्या

राजेश दारव्हेकर
Monday, 23 November 2020

स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगर पालिकेला सलग तीन वेळा देशपातळीवर पारितोषीक जाहिर झाले आहे . सध्या नागरिकात जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देण्यासाठी भिंती रंगविण्यात येत आहेत.

हिंगोली : शहर सुंदर व स्वच्छ रहावे यासाठी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत हिंगोलीनगर पालिकेच्या माध्यमातून प्रत्येक वेळी नागरिकात  जनजागृती केली जात असल्याने दररोज शहरातील कचरा घंटागाडीद्वारे संकलन केला जात आहे .स्वच्छ सर्वेक्षणमध्ये नगर पालिकेला सलग तीन वेळा देशपातळीवर पारितोषीक जाहिर झाले आहे.सध्या नागरिकात जनजागृतीसाठी स्वच्छ सर्वेक्षणाचा संदेश देण्यासाठी भिंती रंगविण्यात येत आहेत.

हिंगोली नगर परिषदेच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत शहरातील नागरिकांच्या घरामधील कचरा प्रत्येक दिवशी गोळा करण्याकरिता घंटागाडी उपलब्ध करून दिल्या आहेत . या घंटागाडीद्वारे जमा करण्यात येणारा कचरा ओला व सुका असा वर्गीकरण करून गोळा करण्यात येतो . विशेष म्हणजे हिंगोली नगर पालिकेतर्फे शहरातील कचऱ्या करिता प्रत्येक दिवशी जनजागृती केली जात आहे त्यातच प्लास्टीक बंदीवर अधिक भर देऊन बाजारपेठमध्ये नागरिकाने प्लास्टीकचा वापर करू नये या दृष्टीने अनेकवेळा मोहिम राबवून आतापर्यंत लाखो रुपयांचा दंड वसूल केलाआहे . हिंगोली नगर पालिके तर्फे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चांगलीच भरारी घेतली आहे . 

जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन मुख्याधिकारी रामदास पाटील व कार्यरत मुख्याधिकारी डॉ . अजय कुरवाडे यांनी चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन हाताळल्यामुळे सलग तीन वेळा हिंगोली नगर पालिकेला देशपातळीवर पारितोषीक जाहिर झाले आहे . ज्यामध्ये सन २०१७-१८ मध्ये हिंगोली नगर पालिकेचा पश्चिम विभागात ३९ वा क्रमांक आल्याने पाच कोटी रुपयाचे पारितोषीक बहाल करण्यात आले होते . सन २०१८ - १ ९ मध्ये देशात २९ वा क्रमांक आल्याने अडीच कोटी रुपयाचे पारितोषीक नगर पालिकेला देण्यात आले . सन २०१ ९ -२० मध्ये देशात निरीक्षक हिंगोली नगर पालिकेचा ११ वा क्रमांक  आला आहे .  कोरोनामुळे पारितोषीकाची 

रक्कम बहाल करण्यात आली नाही . स्वच्छ सर्वेक्षणासाठी मुख्याधिकारी डॉ . अजय कुरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नगर अभियंता रत्नाकर अडशिरे , कनिष्ठ अभियंता सनोबर तसनीम , प्रशासकीय अधिकारी शाम माळवटकर , स्वच्छता निरीक्षक रघुनाथ उर्फ बाळु बांगर , मुंजा बांगर , गजानन बांगर , अशोक गवळी , शहर समन्वयक आशिष रणसिंगे हे पथक दिवसरात्र परिश्रम घेत आहेत .

हिंगोली नगर पालिकेने आतापर्यंत तीन वेळा स्वच्छ सर्वेक्षणात देश पातळीवर पारितोषिक मिळविले आहे. त्यातून साडेसात कोटीची रक्कम प्राप्त झाली आहे.

-डॉ. अजय कुरवाडे ,मुख्याधिकारी, हिंगोली

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Hingoli, the walls painted under the clean survey were also talked about hingoli news