हिंगोली : जिल्ह्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे काम असमाधानकारक

राजेश दारव्हेकर
Wednesday, 23 December 2020

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन २०२०-२१ या वर्षात जिल्ह्याचे कुटुंब नियोजन शस्त्राक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट  ८५०७ याप्रमाणे प्राप्त झालेले आहे . सन २०२०-२१ या वर्षाचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया , दोन अपत्त्यावर शस्त्रक्रिया , पुरुष शस्त्रक्रिया , तांबी कार्य , प्रसूती पश्चात तांबी या प्रमाणे प्रत्येकी निर्देशांकात वार्षिक अपेक्षित कामाच्या पातळीचे काम दर महिन्यात ८.३४ टक्के प्रमाणे वरील निर्देशांकात साध्य करून

हिंगोली : जिल्ह्यात कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन २०२०- २१ या वर्षात कुटुंब शस्त्रक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट आठ हजार ५०५ याप्रमाणे प्राप्त झालेले असताना प्रत्यक्षात मात्र शस्त्रक्रियेचे काम असमाधानकारक असल्याने जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य अधिकारी स्तरावरून सर्वच वैद्यकीय अधिकाऱ्यांना शाक्रियेचे उद्दिष्ट पूर्ण करण्याबाबत तंबी देण्यात आली आहे. 

कुटुंब कल्याण कार्यक्रमांतर्गत सन २०२०- २१ या वर्षात जिल्ह्याचे कुटुंब नियोजन शस्त्राक्रियेचे वार्षिक उद्दिष्ट आठ हजार ५०७ याप्रमाणे प्राप्त झालेले आहे . सन २०२०- २१ या वर्षाचे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, दोन अपत्त्यावर शस्त्रक्रिया, पुरुष शस्त्रक्रिया, तांबी कार्य, प्रसूती पश्चात तांबी या प्रमाणे प्रत्येकी निर्देशांकात वार्षिक अपेक्षित कामाच्या पातळीचे काम दर महिन्यात ८.३४ टक्के प्रमाणे वरील निर्देशांकात साध्य करून

ऑक्टोबर अखेर ५८ टक्के काम होणे अपेक्षित होते. परंतु त्यावेळी अखेर पर्यंत केवळ  जिल्ह्याचे  ०.३ टक्के काम झाले आहे. राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्य, शस्त्रक्रियेसाठी जे वार्षिक उद्दिष्ट दिले आहे त्या अनुषंगाने ऑक्टोबर अखेर पर्यंत ५८ टक्के शस्त्रक्रिया होणे अपेक्षित असताना ऑक्टोबर अखेर पर्यंत काही प्रमाणातच काम झाले आहे. 

हेही वाचा नांदेड : दहावी व बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल आज बुधवारी ऑनलाईन जाहीर होणार -

त्यामुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर दर आठवड्याला आयोजित करून कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही अवधी शिल्लक राहिला आहे त्याकरीता शिबिर आयोजित करावे व त्याच्या कृती नियोजना प्रमाणे काम करून शस्त्रक्रियेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयाने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच आयोजित केलेले शिबिर रद्द होणार नाही याची खबरदारी पण घेण्याच्या सूचना केल्या आहेत. विशेष म्हणजे सद्यस्थितीत कोव्हिड साथरोगाची साथ सर्वत्र  सुरू आहे. यामुळे लाभार्थ्यांची तपासणी करूनच केसेस कल्याण करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. एकूणच त्या परिस्थितीमध्ये  जिल्ह्यात सन २०२०- २१ या वर्षातील कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचे काम असमाधानकारक असल्याने ही चिंतेची बाब ठरत आहे.

 

संपादन - प्रल्हाद कांबळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hingoli: The work of family planning surgery in the district is unsatisfactory hingoli news