esakal | हिंगोली जिल्हा परिषदेची राज्यात अव्वल येण्यासाठी  वाटचाल, पुण्याच्या पथकाकडून विविध विभागाची तपासणी

बोलून बातमी शोधा

file photo}

पुणे येथील पथकाने जिल्हा परिषदेच्या नावीन्य पूर्ण उपक्रमाची मंगळवारी (ता. दोन) तपासणी केली असता समाधान व्यक्त केले.

हिंगोली जिल्हा परिषदेची राज्यात अव्वल येण्यासाठी  वाटचाल, पुण्याच्या पथकाकडून विविध विभागाची तपासणी
sakal_logo
By
राजेश दारव्हेकर

हिंगोली : यशवंत पंचायत राज मध्ये विभागातून प्रथम क्रमांक मिळविलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेने राज्यात अव्वल येण्यासाठी प्रयत्न चालविले असून, पुणे येथील पथकाने जिल्हा परिषदेच्या नावीन्य पूर्ण उपक्रमाची मंगळवारी (ता. दोन) तपासणी केली असता समाधान व्यक्त केले. त्यामुळे जिल्हा परिषदेची वाटचाल आता राज्यातून अव्वल क्रमांक मिळविण्याकडे प्रयत्न चालविले आहेत.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, धनवंतकुमार माळी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेने यशवंतराज पंचायत राज अभियानात विभागात अव्वल क्रमांक पटकाविला आहे. आता राज्यात अव्वल येण्यासाठी हिंगोली जिल्हा परिषदेच्या वतीने प्रयत्न चालविले आहेत. त्यानुसार राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये कोणती जिल्हा परिषद उत्कृष्ट काम करीत आहे.

याची पडताळणी किंवा तपासणी करण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या पथकातील विभागीय आयुक्त पुणे  राजाराम झेंडे  व सांगली जिल्हा पथकाने मंगळवारी जिल्हा परिषदेच्या सर्व विभागातील प्रलंबित प्रकरणे, झिरो पेंडंसी,पदो परिषदेचे पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तान्हाजी लोखंडे यांच्यान्नत्या, सर्वसाधारण सभा, स्थायी सभा, सेवा पुस्तिका, विविध समितीच्या बैठका, आस्थापना विषयक बाबी, अभिलेखे वर्गीकरण, कर्मचारी संख्या, गोपनीय अहवाल, कालबद्ध पदोन्नत्या, नागरिकाच्या तक्रारी, विभागीय आयुक्त यांच्या तपासणीचे मुद्दे, माहिती अधिकार, आरोग्य तपासणी, पाणी टंचाई, जलयुक्त शिवार योजना, तीर्थक्षेत्र विकास, जिल्हा मार्ग विकास यावरील खर्च आदी बाबत परीक्षण करून तपासणी करण्यात आली, याशिवाय नावीन्य पूर्ण कामे २०-२१ आदी बाबत आढावा घेतला.

पंचायतराज पुरस्कारासाठी राज्य शासनाकडून या पथकाची नियुक्ती केली आहे. त्यानुसार या पथकाने दिवसभर मूल्यमापनाची तपासणी केली. यामध्ये शिक्षण विभागातील डिजिटल शाळा, बांधकाम विभागाची प्रकरणे, महिला बालकल्याण विभागाचा पोषण आहार, याशिवाय आस्थापना मधील सेवा पुस्तिका, पोट प्रकरणे,आदी बाबींची तपासणी या पथकाने केली.

सर्व बाबींचा आढावा घेतला असता या पथकाने समाधान व्यक्त केले. आता हा अहवाल पथका मार्फत राज्य शासनाकडे सुपूर्द केला जाणार आहे. त्यानंतरच हिंगोली जिल्हा परिषद राज्यात कोणत्या क्रमांकावर बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.ययावेळी सर्व विभागातील विभाग प्रमुखांची, विस्तार अधिकारी, कनिष्ठ सहायक, प्रशासन अधिकारी आधीची उपस्थिती होती. जिल्हा परिषदेच्या नक्षत्र सभागृहात आज दिवसभर सर्व विभागाची तपासणी सुरू होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे