Jalna: ३१८ वर्षांनंतर जालन्यात मुक्ताई पालखीचे ऐतिहासिक रिंगण; जेईएस मैदानावर भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग; टाळ-मृदंगाच्या गजरात भक्तिमय वातावरण

Historic Muktai Palkhi Ringan Held in Jalna After 318 Years: तब्बल ३१८ वर्षांनंतर जालना शहरात श्री संत मुक्ताबाई पालखीचा ऐतिहासिक रिंगण सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
Jalna

Jalna

esakal

Updated on

उमेश वाघमारे

जालना: तब्बल ३१८ वर्षांनंतर प्रथमच श्री संत मुक्ताबाई पालखी सोहळ्यातील रिंगण सोहळा रविवारी (ता.५) जालना शहरातील जेईएस मैदानावर भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. टाळ-मृदंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जयघोष आणि हजारो वारकऱ्यांच्या उपस्थिती हा अभूतपूर्व भक्ती सोहळा भक्तिरसाने भारावून गेला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com