Shivrajyabhishek Celebration : लंडनमध्ये साजरा झाला शिवराज्याभिषेक सोहळा; धीरजसिंह यांच्या संघटनेचा पुढाकार
Shivrajyabhishek celebration in London : लंडनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक सोहळा ऐतिहासिक उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन लिंबी (घनसावंगी) येथील धीरजसिंह तौर यांच्या संस्थेने केले होते.
कुंभार पिंपळगाव (ता. घनसावंगी) : शिवराज्याभिषेक सोहळा लंडनमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. जालना जिल्ह्यातील लिंबी (ता. घनसावंगी) येथील धीरजसिंह रवींद्र तौर यांनी स्थापन केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज यूथ असोसिएशन’ने यासाठी पुढाकार घेतला होता.