Hivara Ashram News : जलसमाधी आंदोलनाला यश; शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई

अवकाळीची नुकसान भरपाई देणेच्या मागणीसाठी 13 डिसेंबर रोजी स्वाभिमानीचे संघटनेसह विविध संघटनाचे पदाधिकरी व शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.
Hivara Ashram
Hivara Ashramsakal

हिवरा आश्रम - पेनटाकळी प्रकल्पातील मुख्य कालव्याची दुरुस्ती करून शेतकऱ्यांना सिंचनासाठी तात्काळ पाण्याची उपल्बध करुन द्या, अवकाळीची नुकसान भरपाई देणेच्या मागणीसाठी 13 डिसेंबर रोजी स्वाभिमानीचे संघटनेसह विविध संघटनाचे पदाधिकरी व शेतकऱ्यांनी पेनटाकळी प्रकल्पात जलसमाधी घेण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर कार्यकारी अभियंता व उपविभागीय अधिकारी हे बुलडाणा येथुन आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्याबाबत आंदोलनकर्त्याशी चर्चा करीत मागण्या मान्य करत लेखी दिले.

मेहकर तालुक्यातील पेनटाकळी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याच्या गळती संबंधित तात्काळ दुरुस्ती करा, नुकसान भरपाई शेतकऱ्यांना अदा करावी या मागण्यासाठी काल पेनटाकळी प्रकल्पामध्ये जलसमाधी आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रशासनातील एकही अधिकरी आंदोलनस्थळी दाखल झाला नाही. ही बाब आंदोलनकर्त्यांनी रविकांतजी तुपकर यांना कळविली. त्यांनी जिल्हाधिकारी व इतर वरिष्ठाशी तातडीने दुरध्वनीवरुन संपर्क करत माहीती दिली.

अन्यथा मला आंदोलनाच्या ठिकाणी जावे लागेल. अशा इशारा देताच, संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता चोपडे, अमरावती येथील उपविभागीय अधिकारी व्यवस्थापन नवले हे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांच्याबाबत अभियांत शिंदे यांनी चर्चा करत सर्व मागण्या मान्य करत लेखी दिले. त्यानंतर तात्पुरते आंदोलन स्थगित करण्यात आले.

शेतकऱ्यांना घेऊन अधिवेशनात धडक देऊ

तात्पुरते सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. जर प्रशासनाने सदर कार्यवाही करण्यास टाळाटाळ केल्यास नागपुर हिवाळी अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना घेऊन धडक देऊ असा इशारा स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर टाले, तालुका अध्यक्ष गणेश महाराज गारोळे यांच्यासह आंदोलनकर्त्यांनी दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com