
जिल्ह्यातील ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते
हिंगोली : अव्वाच्या सव्वा वीज वितरण कंपनी कडून वीज बिल ग्राहकांना येत असल्याने वीज बिल माफ करण्यासाठी किंवा विजबिलात ५० टक्के सूट द्यावी यासाठी सोमवारी (ता.२३ ) भाजपच्या वतीने येथील गांधी चौकात वीज बिलाची होळी करून आघाडी शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला.
जिल्ह्यातील ग्राहकांना लॉकडाऊन काळात मीटरची रिडींग न घेताच तीन तीन महिन्याची दुप्पट, बिल महावितरण कडून देण्यात आले होते.तरी देखील काही ग्राहकांनी वीज तोडण्याच्या भीतीपोटी बिल भरली आहेत. काही ग्राहकांचा वापर नसतानाही एक हजार बिल देण्याऐवजी तीन- तीन हजार बिले माथी मारल्याचा आरोप देखील भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
हेही वाचा - हिंगोलीत स्वच्छ सर्वेक्षणतंर्गत रंगविलेल्या भिंतीही झाल्या बोलक्या
वीज वितरण कंपनी ग्राहकांना सक्तीने वीज बिल भरावी अन्यथा कनेक्शन तोडल्या जाईल असे महावितरण अधिकाऱ्याकडून सांगितले जात आहे.यावेळी भाजपच्या वतीने वाढीव बिल देऊन नागरिकांना त्रास देणाऱ्या व दिलेली अश्वासन न पाळणाऱ्या आघाडी सरकारच्या निषेध करून वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी आघाडी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनात यांचा होता सहभाग
या आंदोलनात शहराध्यक्ष प्रशांत सोनी, संजय ढोके, बाबा घुगे, महिला जिल्हाध्यक्ष यशोदा कोरडे, प्रणव पवार, शिवाजी मुटकुळे, उमेश नागरे, संदीप वाकडे, माणिक लोडे, श्याम खंडेलवाल, गजानन दराडे, आशिष कुरील, शिवा खडसे, गोपाल बासटवार, अभिषेक अग्रवाल, डॉ. वामन, गजानन वाबळे यांच्यासह भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
संपादन- प्रल्हाद कांबळे