scooty and ev bus accident
sakal
- रविंद्र गायकवाड
बिडकीन - छत्रपती संभाजीनगर-पैठण महामार्गावर इलेक्ट्रिक बस आणि इलेक्ट्रिक स्कुटी यांच्यात शनिवारी (दि. १४) सायंकाळी भीषण अपघात झाला. आर. एल. स्टील कंपनीसमोर झालेल्या या अपघातात एकाच कुटुंबातील तिघे जण जखमी झाले. त्यापैकी राजकुमारी देवी योगेंद्रसिंग राजपूत (वय ४०, रा. फारोळा, ता. पैठण) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून पैठण महामार्गावरील अपघातांचे सत्र पुन्हा चर्चेत आले आहे.