nansaheb divekar
sakal
वैजापूर/शिऊर - धारदार शस्त्राने हत्या करून पोलिस कर्मचाऱ्याचा मृतदेह शेजारील पडक्या घरात जमिनीत पुरून टाकल्याची घटना रविवारी (ता. चार) दुपारी वैजापूर तालुक्यातील बळहेगाव येथे उघडकीस आली. नानासाहेब रामजी दिवेकर (वय ५२) असे मृताचे नाव असून, अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला.