Kandari Partur : चक्क..! बोरवेल मधून येतंय गरम पाणी; गावकऱ्यात भीतीचे वातावरण
Borewell Water : घनसावंगी तालुक्यातील कंडारी परतुर येथे दोन घरांच्या बोरवेलमधून गरम पाणी येत असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी या घटनेवर आश्चर्य व्यक्त केले आहे.
घनसावंगी : कंडारी परतुर ता. घनसावंगी येथे दोन जणांच्या घराच्या बोरचे पाणी उपसा करताना गरम पाणी येत असल्याने नागरिकाकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे यामुळे ग्रामस्थ भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.