esakal | देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण घरी येऊन पाहतात तर.....

बोलून बातमी शोधा

thief news

 उदगीरच्या दत्तनगरमधील एका घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख चार हजार रुपये असा एकूण एक लाख ९१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) घडली.

देवदर्शनासाठी जाताना त्यांच्या मनीध्यानीही नव्हते. पण घरी येऊन पाहतात तर.....

sakal_logo
By
युवराज धोतरे

उदगीर  (जि. लातूर) :  येथील दत्तनगरमधील एका घराचे अज्ञात चोरट्याने कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख चार हजार रुपये असा एकूण एक लाख ९१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.२१) घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, येथील दत्तनगर भागात राहणाऱ्या फिर्यादी योगिता नरेश उस्तुरगे हे आपल्या पतीसह घराला कुलूप लावून शुक्रवारी दुपारी देवदर्शनासाठी उदगीर तालुक्यातील जकनाळ येथे गेले होते. घरात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. घरातील लाकडी कपाटाचे कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे साडेचार तोळ्याचे गंठण, एक तोळ्याचे सोन्याचे मणी मंगळसूत्र व रोख चार हजार रुपये असा एकूण एक लाख ९१ हजार पाचशे रुपयांचा ऐवज चोरट्याने चोरून नेला अशी फिर्यादी ग्रामीण पोलीस ठाण्यात दिल्याने अज्ञात आरोपीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा- दुकानांचे शटर तोडून लाखो रुपयांची चोरी, चाकूर येथील घटना

विहिरीमध्ये पडून पिता-पुत्राचा मृत्यू 

विहिरीत पडल्याने पिता-पुत्राचा मृत्यू झाल्याची घटना शहरालगतच्या निडेबन शिवारात गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास घडली. ग्रामीण पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली. 
ग्रामीण पोलिसांनी दिलेली माहिती अशी ः मोलमजुरी करणारे निडेबन येथील मारुती गंगाराम मामुलवार त्यांचे पुत्र बालाजी मारुती मामुलवार, गंगाधर मारुती मामुलवार यांनी काल रात्री नऊच्या सुमारास निडेबन शिवारात राजकुमार रंगवाळ यांच्या विहिरीच्या काठावर बसून दारू पिली. त्यानंतर तोल जाऊन बालाजी मारुती मामुलवार विहिरीत पडला. त्याला वाचविण्यासाठी मारुती गंगाराम मामुलवार यांनी विहिरीत उडी मारली. या दोघांनाही वाचविण्यासाठी गंगाधरनेही विहिरीत उडी घेतली; परंतु वडील व भावाला वाचविण्यात त्याला यश आले नाही. मारुती मामुलवार (वय ५८) व बालाजी मामुलवार (२०) यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. रात्री उशिरा त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. शासकीय रुग्णालयात आज दुपारी उत्तरीय तपासणीनंतर दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. निडेबनचे पोलिस पाटील मधुकर रंगवाळ यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद झाली.

हे वाचलंत का? - बीड जिल्हा पुन्हा गुंडगिरीकडे, पण खपवून घेणार नाही- पंकजा मुंडे