एकच्या आत घरात.....कोणासाठी बजावले आदेश ते वाचा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 21 April 2020

जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. १३ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश ता. १४ ते ता. ३० एप्रिल २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. ता. १५ व ता. १९ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार हा कालावधी रविवार ता. तीन मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

नांदेड : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव नांदेड जिल्ह्यात रोखण्याच्या अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी त्यांच्या अधिकाराचा वापर करुन ता. १३, ता. १५ व ता. १९ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशामध्ये नमूद शासकीय, निमशासकीय आस्थापना, अत्यावश्यक वैद्यकीय सेवा देणारी आस्थापना व त्यांच्याशी निगडीत दुकाने वगळता इतर सर्व आस्थापना, दुकाने (केवळ अशा आस्थापना, दुकाने ज्यांना पूर्वी ता. १३, ता. १५ व ता. १९ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार चालु ठेवण्यास मुभा देण्यात आलेली आहे.) हे केवळ सकाळी सात ते दुपारी एकपर्यंत चालू राहतील, असे शुद्धीपत्रक निर्गमीत केले आहेत.

गैरसोय टाळण्यासाठी काही अस्थापनांना सुट
नागरिकांची गैरसोय होवू नये म्हणून आदेशात नमूद काही खाजगी दुकाने व आस्थापना चालू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आतापर्यंत केलेल्या उपाययोजनाच्या अनुषंगाने सदर विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यास यश प्राप्त झाले आहे.

हेही वाचा.....दिलासादायक : ३६३ खातेदारांना अडीच कोटींची कर्जमुक्ती

पुर्वीच्या आदेशात केली सुधारणा
जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. १३ एप्रिल २०२० रोजीच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यात मनाई आदेश ता. १४ ते ता. ३० एप्रिल २०२० रोजी मध्यरात्रीपर्यंत ग्रामीण, नागरी व औद्योगिक क्षेत्रात जमावबंदी आदेश, नियमावली आणि उपाययोजनासह लागू करण्यात आले होते. ता. १५ व ता. १९ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार हा कालावधी रविवार ता. तीन मे पर्यंत वाढविण्यात आला आहे.

हेही वाचलेच पाहिजे.... किनवटला दोन रुग्णालय, तपासणी केंद्राची स्थापना : अभिनव गोयल

आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कारवाइ
आदेशाचे पालन न करणारी कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांना साथरोग प्रतिबंधक कायदा १८९७ व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ आणि भारतीय दंड संहिता १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल व कारवाई करण्यात येईल. असे शुद्धीपत्रक जिल्हादंडाधिकारी डॉ. विपीन यांनी ता. २० एप्रिल २०२० रोजी निर्गमित केले आहे. 

शिवशक्तीनगर भागात अन्नधान्य वाटप
राष्ट्रीय बंजारा परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. मोहन चव्हाण यांनी शिवशक्तीनगर भागातील गरजूना ध्यान्याचे किट वितरीत केले. लॉकडाउन झाल्यापासून डॉ. चव्हाण हे नांदेड जिल्ह्यात विविध गरजूना धान्याचे किट व तयार अन्न वाटप करत आहेत. दिलीप ठाकूर रहात असलेल्या शिवशक्तीनगर भागात मिश्र वस्ती असून अनेक कामगार राहतात. ज्या नागरिकांकडे रेशन कार्ड नाही अशांना धान्य मिळणे गरजेचे असल्यामुळे दिलीप ठाकूर यांनी डॉ. चव्हाण यांच्याकडे आग्रह धरला. सोशल डिस्टन्सचे नियम पाळून डॉ. चव्हाण यांच्या हस्ते जीवनाश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the house inside one ..... read the orders issued for whom