कायगाव - गंगापूर तालुक्यात कोरड्या दुष्काळाने शेतकरी हवालदिल झाला आहे. पिके हातची गेली, कर्जाचा डोंगर वाढला असताना सरकारने जाहीर केलेल्या पाच हजार रुपयांच्या मदतीवरून संताप व्यक्त होत आहे..तालुक्यात यंदा पावसाअभावी कापूस, मका, सोयाबीन, तूर, बाजरीसह सर्वच पिके करपून गेली आहेत. बियाणे, खत, औषध, खुरपणीसाठी केलेला खर्चही निघाला नाही. दिवाळी तोंडावर असताना कपडे, फराळ, किराणा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.दुसरीकडे दुष्काळाची पाहणी करण्यासाठी नेत्यांचे दौरे वाढले आहेत. एका नेत्यामागे १५ ते २० गाड्यांचा ताफा, फोटोशूट आणि रील्सबाजी सुरू असल्याने मदतीपेक्षा दौऱ्यांवरच जास्त खर्च अशी टीका शेतकरी करत आहेत..शेतकरी काय म्हणाले?सरकार शेतकऱ्यांना मदत करतंय का? चेष्टा करतंय का? या महागाईच्या काळात गोडतेलाचा डबा तीन हजाराला मिळत असताना पाच हजारात दिवाळी कशी साजरी करायची? त्यापेक्षा दिले नाही तरी चालेल.- भाऊसाहेब शेळके, शेतकरी, भिवधानोराबियाणे, खत, औषधी, खुरपणीचा खर्च पाहता पाच हजार पुरणार का? कर्ज काढून कापूस लावला, तो पाण्याअभावी करपून गेला. आता पाच हजारात कर्ज फेडायचं का? सण साजरा करायचा का ?- अशोक कापसे, शेतकरी, पोटूळ.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.