HSC Result : हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.सकाळ

हिंगोली : या वर्षी पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने कोरोनाच्या प्रादुर्भावाने बारावीच्या परीक्षा (Maharashtra HSC Result 2021) न घेता दहावीतील तीन विषयांचे गुण अकरावीतील गुण व चाचण्यांच्या आधारे गुणदान करून मंगळवारी (ता.तीन) बारावीचा निकाल जाहीर केला आहे. हिंगोली (Hingoli) जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. या वर्षी कोरोनाच्या संकटामुळे दहावी व बारावीच्या परीक्षा न घेता विद्यार्थ्यांच्या गुण, तसेच चाचण्या यावर गुणदान करीत निकाल घोषित केला आहे. दहावीनंतर (SSC) मंगळवारी बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. यात जिल्ह्यातील सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या वर्षी १० हजार ८६७ विद्यार्थ्यांनी आवेदन पत्रे भरली होती. त्यापैकी १० हजार ८६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हे सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

हिंगोली जिल्ह्याचा बारावीचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
जनते पुढे राजकारणी हारले! आंचल गोयल या जिल्हाधिकारीपदी रुजू

हिंगोली, वसमत, कळमनुरी, सेनगाव व औंढा या पाचही तालुक्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यामध्ये विशेष प्रावीण्यासह सात हजार ७३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. प्रथम श्रेणीत तीन हजार ७७, द्वितीय श्रेणी ४४ उत्तीर्ण श्रेणीत सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. तालुकानिहाय लागलेला निकाल पुढील प्रमाणे, हिंगोली तालुका दोन हजार ३६७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. सर्व विद्यार्थी उत्तीर्ण, कळमनुरी दोन हजार २८४ सर्व उत्तीर्ण, वसमत तीन हजार ४२५ सर्व उत्तीर्ण, सेनगाव एक हजार १६५ व औंढा तालुक्यातील एक हजार २२६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. जिल्ह्याचा निकाल शंभर टक्के लागला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com