

माणुसकीचा 'महामार्ग'! मध्यरात्री दीड किमी अंतरावरून धावून आले आणि बाप-लेकीचे प्राण वाचवले; कायगावच्या ५ शेतकरी युवकांचा 'देवदूत' अवतार
Sakal
कायगाव : अहिल्यानगरहून छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या पिकअपचा चालक डुलकीत असताना वाहनावरील ताबा सुटला. शनिवारी (ता १८) पहाटे दीडच्या सुमारास अमळनेर शिवारातील कलमी पुलाजवळ गाडी दुभाजकावर चढली व दिशादर्शक फलकाला जोरात धडकली.