या मार्गावर एका महिन्यात तीन अपघात झाले आहेत. यात पहिल्या अपघातात अंबुलगा येथील एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला, त्यानंतर दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या प्रयत्नात एसटी उलटून ४१ प्रवासी गंभीर जखमी झाले.
चाकूर : नांदगाव पाटी (ता. चाकूर) येथे कारने दुचाकीस्वाराला दिलेल्या धडकेत शिवणखेड येथील पती व पत्नी गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता. १२) सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. महामार्गावर हे ठिकाण ब्लॅकस्पाॅट बनले असून महिन्यात तिसरा अपघात (Nandgaon Pati Accident) घडला आहे. आठवड्यापूर्वी एसटीच्या अपघातात ४१ प्रवासी जखमी झाल्याची घटना याच ठिकाणी घडली होती.