esakal | डोक्यात घुसले संशयाचे भूत : सतरा वर्षा संसार करून संपविले पत्नीला । Murder
sakal

बोलून बातमी शोधा

Murder

डोक्यात घुसले संशयाचे भूत, सतरा वर्ष संसार करून संपविले पत्नीला

sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन : डोक्यात संशयाचे भूत घुसल्याने अनेकांचे संसार उध्वस्त झाल्याचे अनेक उदाहरणे आहेत. असाच काहीसा प्रकार भोकरदन तालुक्यातील रेलगाव या गावी शुक्रवारी (ता.एक) उघडकीस आला. सतरा वर्षाचा संसार करून संशयावरून पतीने आपल्या पत्नीचा विहिरीत ढकलून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली असून, या प्रकरणी रात्री उशिरा भोकरदन पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समिंद्राबाई ऊर्फ गीता रामेश्वर मिसाळ (वय 33 ) असे मयत महिलेचे नाव आहे.

या संदर्भात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार भोकरदन तालुक्यातील रेलगाव येथील रामेश्वर हरिभाऊ मिसाळ यांच्यासोबत समिंद्राबाई ऊर्फ गीता यांचे सतरा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना 15 वर्षांचा एक मुलगा व 12 वर्षांची एक मुलगी आहे. सतरा वर्षाचा सुखी संसार केल्यानंतर मागील काहि महिन्यांपासून रामेश्वर मिसाळ हा पत्नी समिंद्राबाई यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होता. ही बाब समिंद्राबाई यांनी माहेच्यांना सांगितली.

हेही वाचा: मॅरेथॉन स्पर्धेला मोठा प्रतिसाद, मुलीमध्ये जिंतूरची सायली प्रथम

त्यानंतर समिंद्राबाई यांच्या भावाने रामेश्वर मिसाळ यास समजावून सांगितले. मात्र, तरीही रामेश्वरने त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्यांना मारहाण करीत होता. अखेर गुरुवारी रात्री चारित्र्याच्या संशयावरून त्याने पत्नीला रेलगाव शिवारातील एका विहिरीत ढकलून देत समिंद्राबाई यांचा खून केला. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ जगन जामुंदे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चिमुकले पडले उघड्यावर..

रामेश्वर व समिंद्राबाई यांना एक 15 वर्षांचा मुलगा व एक 12 वर्षांची मुलगी आहे. वडीलांनी आईचा खून केल्याने हे दोन्ही चिमुकले आता उघड्यावर पडले आहे. त्यामुळे घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली असून, चिमुकल्यांकडे पाहून अनेकजण हळहळ व्यक्त करीत आहे.

loading image
go to top