औरंगाबाद : तो बोलत होता दुसरीशी फोनवर, पत्नीने गुप्तांगावर चाकू खुपसून केला खून

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 सप्टेंबर 2019

पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
शैलेंद्रवर वार केल्यानंतर पूजाने घरात दोन खोल्यात पडलेले रक्त पुसून काढले. खुनाचा संशय येऊ नये म्हणून तिने घर स्वच्छ केले. जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराची झडती घेतली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिसून आले. विशेषत: शैलेंद्रच्या मित्रापासूनही खरा प्रकार लपवण्यात आला होता. 

औरंगाबाद - शहरातील उच्चभ्रू वसाहत समजल्या जाणाऱ्या उल्कानगरीतील एका उद्योजकाचा पत्नीने जांघेत चाकू भोसकून खून केला. पती अन्य महिलाशी फोनवर बोलत होता. त्यातून पती-पत्नी वाद वाद झाला. त्यानंतर पत्नीने पतीचा खून केला. ही घटना सोमवारी (ता.17) मध्यरात्री घडली. याप्रकरणी पत्नीला पोलिसांनी अटक केली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, शैलेंद्र शिवसिंग राजपूत (वय 40, रा. खिंवसरा पार्क, उल्कानगरी) असे मृताचे नाव आहे, तर पूजा राजपूत असे पत्नीचे नाव आहे. 

शैलेंद्र राजपूत यांची वाळूज एमआयडीसी परिसरात हिरा पॉली प्रिंट प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आहे. त्यांचा वर्ष 2002 मध्ये पूजासोबत प्रेमविवाह झाला होता.  पत्नी पूजा आणि शैलेंद्र यांच्यात यापूर्वी वाद सुरू होते. त्यातून एकवेळ पत्नीने उकळते पाणीही शैलेंद्र यांच्या अंगावर टाकले होते. सोमवारी मध्यरात्री शैलेंद्र काम आटोपून घरी आले. त्यावेळी दोन मुलं आणि पत्नी पूजा घरात होती. काही वेळातच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली व त्यांच्यात कडाक्‍याचे भांडण सुरू झाले. यातून शैलेंद्र याने पूजाला मारहाण करण्यास सुरवात केली. यानंतर रागाच्या भरात पूजा किचनमध्ये गेली. तेथून चाकू हाती घेत तिने शैलेंद्रच्या जांघेत वार केला. आत खोलवर तो घुसल्याने रक्तस्राव होऊन शैलेंद्र जखमी झाले व त्यांची शुद्ध हरपली. यानंतर घाबरलेल्या पूजाने शैलेंद्रच्या मित्राला संपर्क साधला. शैलेंद्रच्या गुप्तांगाजवळ जखम झाली व रक्तस्राव झाल्याचे तिने त्यांना सांगितले. यानंतर शैलेंद्रच्या मित्राने धाव घेत मुलींना फ्लॅटमधून खाली आणले. मुलींनी घडलेला प्रकार सांगितल्यानंतर मित्राने शैलेंद्रचा भाऊ सुरेंद्र यांना फोनवरून माहिती दिली. दरम्यान, घटनास्थळी जवाहरनगर पोलिस पोचले. त्यांनी शैलेंद्र यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल केले; परंतु डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी सुरेंद्र राजपूत यांच्या तक्रारीनुसार पूजाविरुद्ध खून, पुरावा नष्ट केल्याच्या आरोपाखाली गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. एस. तायडे करीत आहेत. 
 
पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न 
शैलेंद्रवर वार केल्यानंतर पूजाने घरात दोन खोल्यात पडलेले रक्त पुसून काढले. खुनाचा संशय येऊ नये म्हणून तिने घर स्वच्छ केले. जवाहरनगर पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी घराची झडती घेतली. त्यावेळी बाथरूममध्ये रक्ताने माखलेले कपडे पोलिसांना दिसून आले. विशेषत: शैलेंद्रच्या मित्रापासूनही खरा प्रकार लपवण्यात आला होता. 
 
मम्मी ने पप्पा को चाकू मारा 
शैलेंद्र यांना रक्ताच्या थारोळ्यात पाहून त्यांच्या छोट्या मुलीने त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला; परंतु वडिलांची हालचाल होत नसल्याने घाबरलेल्या मुलीने तिच्या काकांना फोनवरून "मम्मी ने पप्पा को चाकू से मारा, पप्पा उठ नहीं रहे' असे सांगितले. यामुळे सुरेंद्र राजपूतसह कुटुंबीयांनी खिंवसरा पार्क येथे धाव घेतल्यानंतर भयावह प्रकार निदर्शनास आल्याचे पोलिसांनी सांगितले. 
 
खुनापूर्वी काय घडले 
शैलेंद्र व पूजा यांच्यात वारंवार वाद होत असे. काही महिन्यांपूर्वीच दोघे मुलांसोबत खिंवसरा पार्कमधील एका फ्लॅटमध्ये राहायला आले होते. सोमवारी रात्री शैलेंद्र घरी आले. त्यानंतर एका आर्किटेक्‍ट महिलेशी ते फोनवरून बोलत होते. याचाच पत्नी पूजाला राग आला. त्यातून दोघांत वादाला सुरवात झाली व नंतर खुनाचा प्रकार घडला, असे पोलिसांनी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband murdered at Aurangabad