‘गाव’ कारभारणीचा ‘पती’ जाळ्यात 

फोटो
फोटो
Updated on

नांदेड : आॅरो फिल्टरच्या कामाचा धनादेश देण्याकरिता गाव कारभारणीच्या पतीने संबंधीत कंत्राटदाराकडून दहा हजाराची लाच घेतांना रंगेहात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात मंगळवारी (ता. २४) डिसेंबर रोजी अडकला. 

बिलोली तालुक्यातील हिप्परगा माळ येथील ग्रामपंचायत अंतर्गत नागरिकांना शुध्द पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाकडून त्या गावात आॅरो प्लांट बसविण्यात आला. गावातील नागरिकांना शुध्द पाणी मिळत असल्याने गावकरी सर्व आनंदी होते. आॅरो प्लांटचे काम जळगाव येथील करिष्मा सेल्स ॲंड सर्विसेस या कंपनीला देण्यात आले होते. या कंपनीने वेळेत व चांगल्या दर्जाचे प्लांट उभे केले. मात्र त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी महिला सरपंच यांचे पती त्रासून सोडत होते. केलेल्या कामाचा धनादेश (चेक) देण्याकरिता पंधरा हजाराची लाच कंत्राटदाराला मागितली. 

दहा हजार रुपये घेण्याचे निष्पन्न 

अगोदरच केलेल्या कामात कामगारांची मजुरी निघाली नसल्याने पुन्हा वरून पैसे कसे द्यायचे म्हणून त्याने तडजोडअंती दहा हजार रुपये देण्याचे कबुल केले. मात्र ही रक्कम देण्याची इच्छा नसलेल्या तक्रारदाराने नांदेड येथे येऊन लाचलुचपत प्रतिबंधक विभागात शनिवारी (ता. २१) रोजी तक्रार दिली. या तक्रारीच्या आधारे एसीबीच्या पथकाने त्याच दिवशी पडताळणी सापला लावला. या सापळ्यात दहा हजार रुपये घेण्याचे निष्पन्न झाले. यावरून पोलिस निरीक्षक श्री. नितनवरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह मंगळवारी (ता. २४) हिप्परगा माळ गावात सापळा लावला. 

सरपंच पतीविरुध्द लाचेचा गुन्हा

लावलेल्या सापळ्यात महिला सरपंच यांचे पती लक्ष्मण दत्ता पांचाळ (वय ३८) याला दहा हजार रुपये स्विकारल्यानंतर रंगेहात पकडले. त्याच्याविरुध्द श्री. नितनवरे यांच्या फिर्यादीवरुन बिलोली पोलिस ठाण्यात सरपंच पतीविरुध्द लाचेचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सापळा यशस्वी करण्यासाठी पोलिस उपाधिक्षक विजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक श्री. नितनवरे, पोलिस नाईक हनमंत बोरकर, किसन चिंतोरे, विलास राठोड, अमरजीतसिंग चौधरी आणि श्री. यमुनावाड यांनी परिश्रम घेतले. 

येथे क्लीक कराच - - ऐरणीच्या देवा तुला...

नागरिकांना आवाहन

जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अवाहन करण्यात येते की, शासकिय अधिकारी, कर्मचारी हे शासकिय काम करण्यासाठी लाचेची मागणी करीत असल्यास तसेच त्यांचे लाचेच्या मागणीचे मोबाईल फोनवर लोकसेवक यांचे एसएमएस किंवा व्हिडिओ, आॅडीओ क्लीप असल्यास भ्रष्टाचार संबंधाने काही माहिती असल्यास किंवा माहिती अधिकारात शासकिय अधिकारी किंवा कर्मचारी यांनी शासकिय निधीचा भ्रष्टाचार केला असेस तर टोलफ्री हेल्पलाईन क्रमांक - १०६४ किंवा कार्यलय फोन क्रमांक ०२४६२-२५३५१२ यावर किंवा मोबाईल - ८९७५७६९९१८ वर संपर्क साधावा. 
विजय डोंगरे, पोलिस उपाधिक्षक, एसीबी, नांदेड.  

 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bhokardan Theft
The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Marathi News Esakal
www.esakal.com