हिंगोलीचा हैवान नवरा; बायकोला असं पेटवलं की...

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडांच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशात आता अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली आहे.

हिंगोली: आडगाव मुटकुळे(ता. हिंगोली) येथे पतीनेच आपल्या पत्नीला रॉकेल टाकून पेटवून दिले आहे. या घटनेत ती ७८ टक्के भाजली असून घरगुती वादातून हा प्रकार घडला असल्याचे बोलले जात आहे. हा प्रकार रविवारी (ता.नऊ) पहाटे  घडला.

दिवसेंदिवस महिलांना पेटविण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथील जळीतकांडांच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशात आता अशीच एक घटना हिंगोली जिल्ह्यातील आडगाव मुटकुळे येथे घडली आहे. यात घरातील किरकोळ वादातून हैवान पतीने आपल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून दिले.

हेही वाचा -बारा हजार मजुर ८७८ कामांवर कार्यरत

आठ वर्षांपूर्वी झाला होता विवाह

या घटनेत महिला ७८ टक्के भाजली असून तिच्यावर अकोला येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. संगीता शंकर हनवते (२६) असे मृत्यूशी झुंज देणाऱ्या महिलेचे नाव आहे. संगीताचे माहेर हे गुगुळ पिंपरी असून आठ वर्षांपूर्वी शंकर यांच्यासोबत तिचा विवाह झाला. या दाम्पत्याला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन अपत्य आहेत.

ग्रामस्थांनी घटनास्थळाकडे घेतली धाव

मागील काही दिवसांपासून किरकोळ वादावरून घरात वादंग उठत गेले. हे वादंग एवढे वाढत गेले, की पत्नी घरात एकटी पाहून नवऱ्याने रॉकेलची कॅन घेऊन पत्नीच्या अंगावर ओतली व पेटवून दिले. पेटलेल्या पीडितेने जीव वाचविण्यासाठी आरडा ओरड करीत धाव घेतली. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला.

येथे क्लिक कराहिंगोली जिल्‍ह्यात थंडीचा जोर वाढला

ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

तत्काळ उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल केले. 
या प्रकरणी पती शंकर हनवते, सासू कमलाबाई रामजी हनवते यांच्याविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित महिला मृत्यूशी झुंज देत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Husband's Black Case in Hingoli; Lived his wife alive hingoli news