जरांगे यांच्याविरोधात करणार आत्मक्लेश आंदोलन: डॉ. संजय लाखे: हैदराबाद गॅझेटनुसार आजवर एकही प्रमाणपत्र नाही

हैदराबाद गॅझेटमधून एकही प्रमाणपत्र निघाले नसताना मनोज जरांगे यांनी दिलेल्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह; आठ दिवसांत स्पष्टीकरण न दिल्यास आत्मक्लेश आंदोलनाचा इशारा
maratha reservation

maratha reservation

sakal

Updated on

छत्रपती संभाजीनगर: ‘‘हैदराबाद गॅझेटनुसार वंशावळ न जुळल्याने मराठवाड्यात आजवर एकही प्रमाणपत्र मिळालेले नाही. त्या गॅझेटमधून कोणत्याही जातीची स्पष्टता होत नसल्याने अशा प्रमाणपत्रांची वैधता (व्हॅलिडीटी) टिकणार नाही. सातारा गॅझेटमध्येही केवळ संख्यात्मक नोंद असल्याने त्यातूनही वंशावळ जुळू शकत नाही. मनोज जरांगे यांनी हैदराबाद गॅझेटमधून प्रमाणपत्रे कशी मिळतात, हे आठ दिवसांत स्पष्ट करावे; अन्यथा आम्ही आत्मक्लेश आंदोलन करू’’, असा इशारा शिवसेनेचे सचिव तथा मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक डॉ. संजय लाखे यांनी शुक्रवारी (ता. १८) पत्रकार परिषदेत दिला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com